वसमतमध्ये बोगस ‘गावठाण’ प्रमाणपत्राद्वारे भूखंडाची विक्री: दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल – Hingoli News

वसमतमध्ये बोगस ‘गावठाण’ प्रमाणपत्राद्वारे भूखंडाची विक्री:  दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल – Hingoli News



वसमत शहरातील सर्वेनंबर १८० मध्ये गावठाणचे बनावट प्रमाणपत्र जोडून भुखंडाची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. २५ फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या भागातील खरेदी विक्रीत मोठा गोंधळ उघडकीस येणार असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील सर्वेनंबर १८० मध्ये पालिकेच्या मालकिची जागा आहे. या ठिकाणी मागील काही दिवसांपासून भुखंडाची खरेदी विक्री केली जात होती. मात्र सदर खरेदी विक्री अवैध असल्याच्या तक्रारी नगसेवकांनी पालिका प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यानुसार पालिकेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी तातडीने पथक स्थापन करून खरेदी विक्रीसाठी पालिकेकडून देण्यात आलेल्या दस्ताऐवजाची चौकशी सुरु केली होती. या चौकशीमध्ये या सर्वेनंबर मध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व खरेदी विक्री व्यवहाराच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यामध्ये काही दिवसांपुर्वीच झालेल्या खरेदीखतासाठी वसमत पालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आलेल्या गावठाण प्रमाणपत्राबाबत संशय निर्माण झाला होता. त्यानुसार गावठाण प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्राची शाहनिशा केल्यानंतर सदर प्रमाणपत्रावर संबंधित अधिकाऱ्यांनी आपली स्वाक्षरी नसल्याचे स्पष्ट करीत त्या प्रमाणपत्रावरील स्वाक्षरी बनावट असल्याचे स्पष्ट केले. यावरून गावठाण प्रमाणपत्राचा बनावट प्रकार उघड झाला. त्यामुळे मुख्याधिकारी चिंचाळकर यांनी तातडीने पालिकेचे कर्मचारी ज्ञानेश्‍वर जाधव यांना दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्राधिकृत केले. त्यानंतर जाधव यांनी आज वसमत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये देवानंद साबळे (रा. कोर्टा, ता. वसमत) व मंगेश पारवेकर (रा. वसमत) यांनी दस्ताऐवज तयार करतांना नगर रचना सहाय्यक यांच्या स्वाक्षरीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून फसवणुक केल्याचे नमुद केले. यावरून पोलिसांनी देवानंद व मंगेश यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ पुढील तपास करीत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp