दीक्षाभूमी स्मारक समितीचा वाद चिघळला: भंते ससाईंना हटवून विलास गजघाटे अध्यक्षपदी नियुक्त – Nagpur News

दीक्षाभूमी स्मारक समितीचा वाद चिघळला:  भंते ससाईंना हटवून विलास गजघाटे अध्यक्षपदी नियुक्त – Nagpur News



दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर स्मारक समितीमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. समितीचे अध्यक्ष आणि धम्मसेनापती भंते सुरेई ससाई यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बहुमताने हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषदेत केला. डॉ. गवई यांच्या मते, भंते सुरेई ससाई आजही आदरणीय आहेत, परंतु त्यांनी समितीचा कार्यभार एककल्लीपणे चालवला. धनादेशांवर केवळ स्वतःच सही करत असल्याने नाइलाजास्तव त्यांना हटवावे लागले. गवई यांनी असेही सांगितले की, पुढील २४ तासांत भंतेंनी समितीच्या इतर सदस्यांसोबत अध्यक्षपदी कायम राहण्याची इच्छा व्यक्त केल्यास, बहुमताच्या अटी मान्य केल्यास त्यांना सामूहिकरित्या कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल. यावेळी अध्यक्ष विलास गजघाटे आणि डॉ. प्रदीप आगलावे उपस्थित होते. हा महत्त्वाचा निर्णय २२ जून रोजी सायंकाळी दीक्षाभूमी येथे झालेल्या स्मारक समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ११ पैकी ८ सदस्यांनी या बैठकीत भाग घेतला आणि एकमताने विलास गजघाटे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा ठराव मंजूर केला. धर्मादाय उपायुक्त, नागपूर यांच्या २० फेब्रुवारी, २०२६ (आदेश क्र. ५) आणि १२ मे, २०२६ रोजीच्या आदेशानुसार ही विश्वस्तांची बैठक झाली. बैठकीला डॉ. कमल गवई, डॉ. राजेंद्र गवई, एन.आर. सुटे, विलास गजघाटे, डॉ. डी. बी. दाभाडे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, भंते नागदीपंकर आदी सदस्य उपस्थित होते. विद्यमान अध्यक्ष भंते ससाई, सुधीर फुलझेले आणि ॲड. आनंद फुलझेले हे बैठकीला गैरहजर होते. डॉ. गवई यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, मागील तीन वर्षांत डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये झालेल्या नियुक्त्यांमध्ये गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याची शंका आहे. भंतेचे सहकारी रवी मेंढे आणि इतरांकडून महाविद्यालयीन तसेच स्मारक समितीच्या कामकाजात विनाकारण हस्तक्षेप होत होता. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे गवई यांनी स्पष्ट केले. मागील तीन वर्षांच्या अंकेक्षण अहवालातही अनियमितता आढळल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, भंते सुरेई ससाई यांनी ही बैठकच असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. सचिव म्हणून डॉ. राजेंद्र गवई यांची निवड अमान्य असून, उर्वरित तीन सदस्यांचीही धर्मादाय आयुक्तालयाच्या ‘चेंज रिपोर्ट’मध्ये अद्याप नोंद नाही, असे भंते ससाई म्हणाले. या संदर्भात त्यांनी रविवारीच पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे. डॉ. गवई यांनी मात्र न्यायालयानेच आपल्याला सचिव म्हणून मान्यता दिल्याचा दावा केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp