
विधान परिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतांच्या मोजणीला सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. केवळ ६१४ मतांची मोजणी असल्याने अवघ्या दोन तासांतच त्याची प्रक्रिया संपेल. सकाळी दहा वाजेपर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. नियोजन भवनात होणाऱ्या या मतमोजणीसाठी महसूल व पोलिस प्रशासनाची टीम सज्ज झाली आहे. संपूर्ण मतमोजणी केवळ दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. त्यासाठी एकूण ४ टेबलची व्यवस्था करण्यात आली. दोन टप्प्यांत मोजणी होईल. सुरुवातीला सर्व मतपेट्यांमधून मते बाहेर काढली जातील. त्यानंतर मोजणी करून वैध आणि अवैध मते वेगळी करण्याचे काम पहिल्या फेरीत पूर्ण केले जाईल. दुसऱ्या फेरीत प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. पहिल्या फेरीत वेगळी केलेली वैध मते या चारही टेबलवर मोजणीसाठी दिली जातील. प्रत्येक दोन टेबलसाठी एक प्रांत अधिकारी पर्यवेक्षक म्हणून काम पाहतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी सांगितली. भाजपचे राजेंद्र राऊत आणि मविआचे वसंत देशमुख यांच्यात निवडणूक झाली. मोठ्या चुरशीने मतदान झाल्याने निकालाची उत्सुकता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
