योग भारताचा प्राचीन, समृद्ध आणि गौरवशाली वारसा!: मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा – Mumbai News

योग भारताचा प्राचीन, समृद्ध आणि गौरवशाली वारसा!:  मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा – Mumbai News



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील जुहू बीच येथे 12व्या भव्य आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ‘योगा ऑन द बीच’ कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात सहभागी होत योगासने केली. यावर्षीचा योग दिन ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित असून, मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांसह या सोहळ्यात उत्साहाने भाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, योग ही भारताची अत्यंत प्राचीन आणि समृद्ध चिकित्सा पद्धती असून संपूर्ण जगाने योगविद्येचे महत्त्व ओळखले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांनी अत्यंत कमी कालावधीत एकमताने मंजूर केला, ही भारतासाठी अत्यंत गौरवाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. आज संपूर्ण जगभरात योगाचा व्यापक प्रसार झाला असून योगविद्येबाबत मोठ्या प्रमाणात कुतूहल निर्माण झाले आहे. सध्याच्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे आजार आणि नॉन-कम्युनिकेबल डिसीजेस ही मोठी समस्या असून त्यावर योग हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. नियमित योगाभ्यासामुळे व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहून संकटांचा सामना करण्याची क्षमता विकसित होते. भविष्यात सशक्त आणि निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी योगविद्येचा अधिकाधिक प्रचार व प्रसार होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले. तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देत सर्वांना निरोगी राहण्याचा संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला. तणावमुक्तीसाठी योगविद्येचा अंगीकार करा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले. ते म्हणाले की, योगविद्या ही भारताच्या प्राचीन जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे योगाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली असून आज जगातील जवळपास प्रत्येक देशात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत निरोगी राहायचे असेल, तर योगासने आणि योगविद्येचा स्वीकार करणे आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे.” योग दिनाचा इतिहास आणि भारताचा वारसा भारत आणि योग यांचे नाते हजारो वर्षांपासूनचे आहे. भारतीय संस्कृतीत रुजलेला योग आज शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी जागतिक चळवळ बनला आहे. योगाचे सार्वत्रिक महत्त्व आणि फायदे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने 2014 मध्ये 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या 69 व्या अधिवेशनात मांडलेल्या प्रस्तावाला 175 देशांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर 21 जून 2015 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp