‘सुजनरंगोत्सव’: संभाजीनगरमध्ये २८ जून रोजी ‘शब्दयात्रा, कविता आणि बरेच काही…’; कथ्थक नृत्यासह कविसंमेलनाची पर्वणी – Chhatrapati Sambhajinagar News

‘सुजनरंगोत्सव’:  संभाजीनगरमध्ये २८ जून रोजी ‘शब्दयात्रा, कविता आणि बरेच काही…’; कथ्थक नृत्यासह कविसंमेलनाची पर्वणी – Chhatrapati Sambhajinagar News



छत्रपती संभाजीनगर येथील साहित्य आणि कलाप्रेमींसाठी या महिन्यातला शेवटचा रविवार (२८ जून) एक अनोखी मैफल घेऊन येत आहे. ‘सुजनरंगोत्सव’ अंतर्गत ‘शब्दयात्रा, कविता आणि बरेच काही…’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे सायंकाळी साडेपाच वाजता आयोजन करण्यात आले आहे. न्यायमूर्ती कै. धनंजय गोविंद देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. महोत्सवाचे प्रथम वर्ष आहे. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पुण्याच्या प्रसिद्ध नृत्यांगना जयश्री म्हरोळकर आणि त्यांचा समूह सादर करत असलेला नेत्रदीपक ‘कथ्थक नृत्यविष्कार’. यासोबतच एक कविसंमेलनही पार पडणार आहे, अशी माहिती कवयित्री मृणाल देशपांडे यांनी दिली. कविसंमेलनात राज्यातील नामवंत कवी आणि कवयित्री आपल्या कविता सादर करतील. त्यात प्रफुल्ल कुलकर्णी (पुणे), अमिता पेठे पैठणकर (पुणे), गिरीश जोशी, प्रिया धारूरकर, सुनील उबाळे, माधुरी चौधरी, सचिन वालतुरे, अंजली दीक्षित, अजय त्रिभुवन, संध्या फुलपगार, मृणाल देशपांडे यांचा समावेश आहे. रविवारी सायंकाळी ५:३० ते ७:३० च्या दरम्यान औरंगपुऱ्यातील कै. गोविंदभाई श्रॉफ सभागृहात होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी संपूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. आयोजकांच्या वतीने सर्व रसिक प्रेक्षकांना या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp