संभाजीनगरात ‘तुम्ही येथे का बसलात?’ विचारत भावा-बहिणीवर चाकूने हल्ला: कॉलेज कॅम्पसमध्ये गुंडगिरी!, सिटी चौक पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल – Chhatrapati Sambhajinagar News

संभाजीनगरात ‘तुम्ही येथे का बसलात?’ विचारत भावा-बहिणीवर चाकूने हल्ला:  कॉलेज कॅम्पसमध्ये गुंडगिरी!, सिटी चौक पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल – Chhatrapati Sambhajinagar News



बी.ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी बहिणीसह कॉलेजमध्ये गेलेल्या तरुणावर दोघांनी चाकू व धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाच्या छाती, पाठीवर आणि गळ्याजवळ वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या तरुणावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (16 जून) दुपारी 1.30 ते 2 वाजेच्या सुमारास हडको कॉर्नर परिसरातील महाविद्यालय परिसरात घडली. या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात सुफियान पठाण व त्याचा एक साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये गुंडगिरी प्रकरणात मुजाईद वाहिद कुरेशी (24, रा. हर्सूल सावंगी) याच्या फिर्यादीनुसार, तो त्याची बहीण रश्मीन फातेमा कुरेशी (19) हिच्यासोबत बी.ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी कॉलेजमध्ये गेला होता. प्रवेश विभागातील कर्मचाऱ्यांची जेवणाची वेळ सुरू असल्याने त्यांना काही वेळ थांबण्यास सांगण्यात आले. त्यामुळे दोघे ज्युनियर कॉलेजच्या गार्डनमध्ये बसले होते. गार्डनमध्ये बसलेल्या भावंडांजवळ दोन युवक आले व ‘तुम्ही कोण आहात आणि येथे का बसला आहात?’ अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर मुजाईदने आपण बहीण-भाऊ असल्याचे सांगितले. संतापलेला आरोपी फिर्यादीला “रुक तेरे को बताता’ असे म्हणून कुणाला तरी फोन लावत शिवीगाळ करू लागला. त्याने जवळील चाकू काढून थेट छातीवर वार केला. पाठीमागून पकडून वार हल्ल्यादरम्यान सुफियानसोबत असलेल्या त्याच्या साथीदाराने मुजाईदला पाठीमागून पकडून ठेवले. त्यानंतर त्याने धारदार वस्तूने पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. तेव्हा मुजाईदला पाठीमागून पकडणारा साथीदार त्याच्या गळ्यावर वार कर असे म्हणाला. त्यानुसार सुफियान याने मुजाईदच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुजाईदने मान खाली घेतल्याने वार दाढीच्या भागावर लागला आणि मोठा अनर्थ टळला. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपींनी रश्मिनला धक्का देत तेथून पळ काढला. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या मुजाईदला तेथील दोन युवकांनी मदत केली. त्यांनी त्याला एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र त्यांनी त्याला दाखल करून घेतले नाही. तेव्हा मुजाईदला त्याच्या भावांनी घाटी रुग्णालयात दाखल केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp