ऑपरेशन टायगर सोपं नाही: शिवसैनिकांनी रक्त आटवून निवडून दिले, आता बेईमानी केली तर जनता सोडणार नाही; संजय राऊतांचा बंडखोरांना इशारा – Maharashtra News

ऑपरेशन टायगर सोपं नाही:  शिवसैनिकांनी रक्त आटवून निवडून दिले, आता बेईमानी केली तर जनता सोडणार नाही; संजय राऊतांचा बंडखोरांना इशारा – Maharashtra News



महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’वर अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरी करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. हा लोकशाहीचा केलेला तमाशा असून आता पुन्हा जर कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असे नेत्यांनी ठणकावून सांगितले. शिवसैनिकांनी रक्त आटवून निवडून दिले, बेईमानी खपवून घेणार नाही- संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत अत्यंत संतापलेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, हे सर्व खासदार मशाल चिन्हावर, उद्धव ठाकरेंच्या नावावर आणि लाखो प्रामाणिक शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे खासदार झाले आहेत. शिवसैनिकांनी दिवस-रात्र एक करून, स्वतःचे रक्त आटवून यांना निवडून दिले आहे. त्यामुळे या अशा पद्धतीने पक्षाशी बेईमानी करण्याचा अधिकार यांना कोणीही दिलेला नाही. ही निव्वळ डरपोकगिरी असून जनता आता हा तमाशा सहन करणार नाही. १४ जूनच्या बैठकीत घेतल्या होत्या साईबाबा आणि मुलांच्या शपथ संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी ‘मातोश्री’वर झालेल्या खासदारांच्या बैठकीचा धक्कादायक अंतर्गत किस्सा उघड केला. “१४ जून रोजी झालेल्या बैठकीला सर्व खासदार प्रत्यक्ष आणि ऑनलाईन उपस्थित होते. त्या बैठकीत एका खासदाराने तब्बल ५ वेळा साईबाबांची शपथ घेतली, दुसऱ्याने आई भवानीची तर एकाने स्वतःच्या पोटच्या मुलांची आणि आईची शपथ घेतली होती. बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगणारे हे खासदार जर आता ५० कोटी रुपयांच्या डीलसाठी विकले जात असतील, तर यांना जनता रस्त्यावर फिरू देणार नाही,” असा जळजळीत इशारा राऊत यांनी दिला. ऑपरेशन टायगर सोपं नाही- राऊत ज्यांना कुणाला आता सत्ताधाऱ्यांच्या गोटात जायचे असेल, त्यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊन दाखवावे, असे थेट आव्हान ठाकरे गटाने दिले आहे. राऊत यांनी स्पष्ट केले की, ‘ऑपरेशन टायगर’ करणे इतके सोपे नाही. पक्षाने या सर्व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन तातडीने सर्व खासदारांसाठी अधिकृत व्हीप जारी केला आहे, तसेच दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पक्षाच्या वतीने अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा ॲडव्हान्स शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मध्यरात्री एक अत्यंत खळबळजनक ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी रात्रीत कोट्यवधी रुपयांचा ॲडव्हान्स वाटण्यात आल्याचा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे. सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp