सीजेपी राबवित आहे राहुल गांधींचाच अजेंडा: खा. डॉ. कल्याण काळे: डोणगावकर, ॲड. अक्रम यांचा पदग्रहण सोहळा संपन्न – Chhatrapati Sambhajinagar News

सीजेपी राबवित आहे राहुल गांधींचाच अजेंडा:  खा. डॉ. कल्याण काळे: डोणगावकर, ॲड. अक्रम यांचा पदग्रहण सोहळा संपन्न – Chhatrapati Sambhajinagar News



खासदार डॉ. कल्याण काळे यांनी सोमवारी (दि. १५) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, क्रॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. हा अजेंडा घेऊन ते उतरले असले तरी, आमचे नेते खासदार राहुल गांधी यांनी ही मागणी आधीच केली होती. एनएसयूआय, युवक काँग्रेस आणि इतर पक्षांनीही हा मुद्दा उचलून धरला होता, त्यानंतर आता सीजेपीने तो स्वीकारला आहे. शहागंजमधील गांधी भवनात सोमवारी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहराध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर काँग्रेस नेत्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार काळे यांच्यासह प्रवक्ते हनुमंत पवार, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हाध्यक्ष डोणगावकर, ॲड. अक्रम आणि सागर साळुंके उपस्थित होते. खासदार काळे पुढे म्हणाले की, सीजेपी संविधान वाचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर विश्वास ठेवून उतरल्याचे सांगत आहे. मात्र, ते निवडणुका लढणार आहेत की नाही किंवा संघटना बांधणार आहेत की नाही, याबाबत त्यांनी स्पष्टता दिलेली नाही. सेक्युलर मतांची विभागणी होणार नाही, याची काळजी सर्वांना घ्यावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडत पालकमंत्री संजय शिरसाट यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न बोललेले बरे, असा टोला लगावला. काळे यांनी १९७८ मध्ये काँग्रेस शून्य झाली होती, पण पुन्हा उभी राहिली, याची आठवण करून दिली. देशात सध्या तीच परिस्थिती असली तरी, त्यावेळी काँग्रेसवर भाजपवर असलेल्या आरोपांइतके आरोप नव्हते, असे ते म्हणाले. देशातील जागरूक जनता २०२९ मध्ये पुन्हा एकदा बदल घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटनेला बळ देण्याचे काम सुरू केले असून, पुढील काळात काँग्रेस पुन्हा नव्याने उभी राहिलेली दिसेल, असेही त्यांनी सांगितले. प्रवक्ते पवार यांनी एसआयआर मोहीम आणि मतदारांना सहकार्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या सहकार्याबद्दल माहिती दिली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp