आरपीएफ नांदेडकडून रेल्वे आग प्रकरणाचा 15 दिवसांत उलगडा: आरोपीला वाशीममधून अटक; 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी – Hingoli News

आरपीएफ नांदेडकडून रेल्वे आग प्रकरणाचा 15 दिवसांत उलगडा:  आरोपीला वाशीममधून अटक; 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी – Hingoli News



हिंगोली रेल्वे स्थानकावर २७ मे २०२६ रोजी नरखेड–काचेगुडा इंटरसिटी एक्सप्रेसच्या एका डब्यातील शौचालयात आग लागल्याची घटना घडली होती. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी सखोल चौकशी करून वाशिम येथे एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याची चौकशी चालवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरखेड काचिगुडा इंटरसिटी एक्सप्रेस हिंगोली येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आल्यानंतर रेल्वेच्या डी 5 कोचमधील स्वच्छतागृहातून दूर निघत असल्याचे दिसून आले. सदर प्रकार रेल्वे पोलीस चे जमादार व्ही. एम. शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन यंत्राच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवले.त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणात रेल्वे विभागाच्या पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचा तपास करण्यासाठी वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त दीप चंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली १ जून २०२६ रोजी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती . या विशेष तपास पथकाने पूर्णा रेल्वे स्थानकापासून ते अकोला रेल्वे स्थानकापर्यंत सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेऊन आरोपीचा शोध घेण्यात आला. या प्रकरणात आरोपीची ओळख पटल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी ११ जून २०२६ रोजी वाशीम जिल्ह्यातील मंगेश जाधव या आरोपीला ओळख पटवून अटक करण्यात आली. आरोपीचा या आगीच्या घटनेशी थेट संबंध असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर त्याला पूर्णा येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी मंगेश जाधव याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . आरपीएफ नांदेडच्या या यशस्वी कामगिरीमुळे रेल्वे प्रवासी आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी त्यांची कटिबद्धता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. रेल्वे पोलिसांनी त्याची सखोल चौकशी सुरू केली असून आग लावण्या मागचे नेमके कारण काय आहे याचा शोध रेल्वे पोलिसांनी सुरू केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp