
सोलापूर शहरात आज एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील वर्दळीच्या ७० फूट रोडवरील ‘शिवकुमार ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानात भरदिवसा बंदूक दाखवून सोन्याचे दागिने पळवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आज (शनिवार, १३ जून) दुपारी १२ वाजेदरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला. भरदिवसा तीन दरोडेखोरांची एन्ट्री मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपार असल्याने ७० फूट रोडवर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. शिवकुमार ज्वेलर्स हे दुकान उघडून काही वेळच झाला होता. इतक्यात ग्राहक बनून आलेल्या तीन अज्ञात दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केला. दुकानदाराला काही समजण्याच्या आतच दरोडेखोरांनी थेट बंदूक बाहेर काढली आणि दुकानदाराच्या डोक्याला लावली. बंदुकीचा धाक दाखवून दागिने लंपास
बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या दुकानदाराला प्रतिकार करणे अशक्य झाले. दरोडेखोरांनी अवघ्या काही मिनिटांतच दुकानातील सोन्याचे मौल्यवान दागिने गोळा केले आणि घटनास्थळावरून पोबारा केला. दरोडा टाकून आरोपी ज्या वेगाने आले, त्याच वेगाने दुचाकीवरून फरार झाले. पोलीस यंत्रणा अलर्ट
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ शिवकुमार ज्वेलर्स येथे दाखल झाले. लुटलेल्या सोन्याच्या दागिन्यांची नेमकी किंमत किती आहे, याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. पोलिस सध्या दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. सोनसाखळी चोरावर पोलिसांची फिल्मी स्टाइल झडप, व्हिडिओ:’क्राइम पेट्रोल’ पाहून बनला चेन स्नॅचर ‘क्राइम पेट्रोल’ हा लोकप्रिय गुन्हेगारी मालिकेचा कार्यक्रम पाहून पोलिसांना चकवा देण्याची युक्ती शिकलेल्या एका सराईत चेन स्नॅचरला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अक्षरशः फिल्मी स्टाईलमध्ये पाठलाग करून अटक केली आहे. आरोपी चोरी करून पळून जात असताना पोलिसांनी सापळा रचत त्याला जमिनीवर झडप घालून पकडले. या थरारक कारवाईचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
