पुण्यात 15 जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा: धरणसाठा घटल्याने महापालिकेचा निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची चिंता – Pune News

पुण्यात 15 जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा:  धरणसाठा घटल्याने महापालिकेचा निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची चिंता – Pune News



पुणे शहरात १५ जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. खडकवासला धरण समूहातील पाणीसाठा कमी झाल्याने पुणे महानगरपालिकेने हा कठोर निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या साखळीत सध्या केवळ ५ अब्ज घनफूट (TMC) पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराला दररोज सुमारे १,५०० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. यंदा मान्सून लांबण्याची आणि सुरुवातीला पाऊस कमी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने उपलब्ध पाणीसाठा जुलैऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत पुरवण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. सध्या खडकवासला धरणात ०.८४ टीएमसी, पानशेतमध्ये २.२७ टीएमसी आणि वरसगावमध्ये १.९० टीएमसी साठा आहे. टेमघर धरण पूर्णपणे रिकामे झाले आहे. पाण्याचा गैरवापर आणि अपव्यय रोखण्यासाठी पुणे महापालिकेने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. शहरातील सर्व व्यावसायिक कार वॉशिंग सेंटर्स आणि स्विमिंग पूल तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना पुणेकरांना पाण्याचा प्रत्येक थेंब काळजीपूर्वक आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, “पाण्याचे संकट गंभीर असून, प्रशासनासोबतच नागरिकांनीही पाणी बचतीची मोहीम राबवावी.” महापालिका नवीन वेळापत्रकानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करत असून, नागरिकांनी या परिस्थितीत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp