कोल्हापुरातील भयंकर प्रकार!: 10 महीने तरुणीवर सामूहिक अत्याचार, अटकेनंतर बलात्काऱ्याने कॅमेऱ्यासमोरच मिश्या पिळत दिली खुन्नस! – Kolhapur News

कोल्हापुरातील भयंकर प्रकार!:  10 महीने तरुणीवर सामूहिक अत्याचार, अटकेनंतर बलात्काऱ्याने कॅमेऱ्यासमोरच मिश्या पिळत दिली खुन्नस! – Kolhapur News



ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने एका महाविद्यालयीन तरुणीशी ओळख वाढवून, तिच्यावर प्रियकरासह चार जणांनी गेल्या 10 महिन्यांपासून विविध ठिकाणी धमक्या देत अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. आरोपींच्या या क्रौर्याची परिसीमा गाठल्याने, असह्य झालेल्या पीडितेने अखेर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या नराधमांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, आज (11 जून) त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांच्या चेहऱ्यावरील मस्तवालपणा आणि खुन्नस पाहून, त्यांना खरोखरच पोलिस कोठडीत ठेवले होते का, असा संतापजनक प्रश्न उपस्थित होत आहे. मुरगूड सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, एका आरोपीने पोलिस गाडीत बसूनच माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर मिश्या पिळत आपली मस्ती आणि खुन्नस दाखवण्याचा संतापजनक प्रकार केला. पोलिसांसमोरच या बलात्काऱ्यांकडून असा माज दाखवला जात असल्याने, पोलिसांनी त्यांना व्हीआयपी वागणूक दिली आहे का आणि त्यांच्या मनातील खाकी वर्दीचा धाक खरोखरच संपला आहे का? असे संतप्त प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केले जात आहेत. कोण आहेत आरोपी? मुरगूड पोलिस ठाण्यात पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी आदित्य बाजीराव शेटके (वय 24, रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी), रणजित संभाजी मुधोळकर (वय 29, रा. सोळांकूर, ता. राधानगरी), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (वय 24, रा. राधानगरी) आणि विक्रम रामचंद्र पाटील (वय 22, रा. बुजवडे, ता. राधानगरी) यांना अटक करण्यात आली आहे. प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या सहा-सात महिन्यांपासून आरोपींनी मुरगूड येथील तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी आणि कोल्हापुरातील सीबीएस परिसरातील लॉजवर तिच्यावर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्याच्या बहाण्याने त्यांनी पैशांची मागणी केली असता, बदनामीच्या भीतीने पीडितेने आदित्य शेटके, रणजित मुधोळकर आणि प्रणवगिरी पालकर यांना काही रक्कमही दिली. मात्र, तरीही विक्रमने ‘तू माझ्याशी लग्न केले तरच तुझे व्हिडीओ आणि फोटो डिलीट करतो’ अशी सतत धमकी देत तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरूच ठेवला. हा अमानुष त्रास असह्य झाल्याने अखेर पीडितेने धैर्याने मुरगूड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत या चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी मुख्य आरोपी आदित्य शेटके याने 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत या भयानक अत्याचाराला सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने आदित्यने तिला मुदाळतिट्टा येथे बोलावून घेतले आणि त्यानंतर मुरगूडमधील तलाव परिसरातील झाडीत नेऊन तिचे फोटो काढले. हेच फोटो एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची सतत धमकी देत त्याने तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला. विविध ठिकाणच्या लॉजवर अत्याचार त्यानंतर आदित्यने या तरुणीची ओळख रणजितशी करून दिली. रणजितनेही फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत तिच्यावर गिरगाव, कात्यायनी, कोल्हापूर शहर आणि पाचगाव परिसरातील विविध लॉजवर नेऊन अत्याचार केले व तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले. हे इथेच थांबले नाही, चंद्रशेखरने तिला प्रणवगिरीशी बोलण्यास भाग पाडले, ज्याने पुन्हा तिला धमकावून स्वतःच्या कारमधून नेत एका लॉजवर तिच्यावर अत्याचार केला. अशा प्रकारे, बदनामीची सतत भीती दाखवत या नराधमांनी संगनमत करून पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp