‘बिर्याणी म्हणजे सहमती नव्हे!’: 370 रुपयांच्या बिर्याणीवरून प्रणित मोरेची माफी, तरुण नोकरीवरून बडतर्फ, मुंबई पोलिस-झोमॅटोही मैदानात, वाचा पूर्ण स्टोरी

‘बिर्याणी म्हणजे सहमती नव्हे!’:  370 रुपयांच्या बिर्याणीवरून प्रणित मोरेची माफी, तरुण नोकरीवरून बडतर्फ, मुंबई पोलिस-झोमॅटोही मैदानात, वाचा पूर्ण स्टोरी

मुंबई34 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

विनोदवीर (Comedian) प्रणीत मोरे याच्या स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये ३७० रुपयांच्या चिकन बिर्याणीवरून महिलांबद्दल अश्लील आणि अक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तरुणाला मोठा फटका बसला आहे. सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर, या तरुणाला त्याच्या कंपनीने नोकरीवरून काढून टाकले (Fired) आहे.

सोशल मीडियावरील ‘हक्क गाजवण्याची’ (Entitlement) आणि व्यावहारिक मानसिकतेची ही चर्चा आता केवळ एका व्हिडिओपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर त्या तरुणाला याचे थेट व्यावसायिक परिणाम भोगावे लागले आहेत. विशेष म्हणजे या मानसिकतेवर जनसामान्यांतूनही प्रचंड चीड व्यक्त करण्यात येतेय.

नेमके काय घडले?

प्रणीत मोरेच्या एका शोमधील क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाली होती, ज्यामध्ये गुरुग्राममधील हिमांशु जांगरा नावाच्या एका तरुण प्रेक्षकाने एक किस्सा सांगितला. त्याने एका मुलीला डेटवर नेले. तिला बिर्याणी खावू घालण्यासाठी 370 रुपये खर्च केले. त्यानंतर ती मुलगी घरी सोड म्हणाली. यावर शोमध्ये त्या तरुणाने, ‘तुझ्यावर 370 रुपये खर्च केलेत. ते मी वसूल तर करणारच.'(तिला शारीरिक किंवा भावनिक बदल्यात काहीतरी द्यावे लागेल.) अशी अश्लील टिप्पणी केली होती.

नेटकऱ्यांनी तरुणाला शोधले

प्रणित मोरे याच्या शोमधला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या तरुणाचा शोध सुरू केला. इंटरनेट युजर्सनी त्या तरुणाची ओळख पटवली आणि तो गुरुग्राम (Gurugram) येथील एका नामांकित कंपनीत काम करत असल्याचे शोधून काढले. त्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर त्या कंपनीला टॅग करून, “तुमच्या कंपनीत अशा मानसिकतेचे लोक काम करतात का?” असा जाब विचारत कारवाईची मागणी केली.

एकीकडे कारवाई, दुसरीकडे माफी

'बिर्याणी म्हणजे सहमती नव्हे!': 370 रुपयांच्या बिर्याणीवरून प्रणित मोरेची माफी, तरुण नोकरीवरून बडतर्फ, मुंबई पोलिस-झोमॅटोही मैदानात, वाचा पूर्ण स्टोरी

महिलांच्या सुरक्षेचा आणि आदराचा मुद्दा लक्षात घेता, कंपनीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. कंपनीने अधिकृत निवेदन जारी करत सांगितले की, “आमची कंपनी महिलांचा आदर, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि नैतिक मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य देते. अशा प्रकारची महिला-विरोधी, अश्लील आणि मागासलेली मानसिकता बाळगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आमच्या कंपनीत स्थान नाही. व्हायरल व्हिडिओतील तरुणाच्या वर्तनाचा तपास केल्यानंतर, त्याला तात्काळ प्रभावाने नोकरीवरून बडतर्फ (Terminate) करण्यात आले आहे.” दुसरीकडे, कॉमेडियन प्रणीत मोरे यालाही स्टेजवर ही चर्चा ज्या पद्धतीने हाताळली, त्यावरून टीकेला सामोरे जावे लागले; ज्यानंतर त्याने जाहीरपणे माफी मागितली आहे.

महिला डॉक्टरही वादात

प्रणित मोरेच्या शोवरील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता एका महिला डॉक्टरची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, तिच्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या महिला डॉक्टरने शो दरम्यान पुरुषांच्या मृतदेहांच्या गुप्तांगांवरून अत्यंत आक्षेपार्ह आणि भद्दी टिप्पणी केली. या विधानानंतर सोशल मीडिया युजर्सने तिच्यावर कडाडून टीका केली आहे. स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये अलीकडेच एका महिला डॉक्टरने सहभाग घेतला होता. याआधी याच शोमधील ‘३७० ची बिर्याणी’ या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. तो वाद शांत होत नाही तोच, आता या महिला डॉक्टरच्या वक्तव्याने नवीन वाद डोकं वर काढलं आहे.

क्युरेटेड कंटेंटवर बंदीची मागणी

वैद्यकीय शिक्षणादरम्यान (Medical Studies) मृतदेहांचे (Dead Bodies) विच्छेदन करतानाचे अनुभव सांगताना या महिला डॉक्टरने पुरुषांच्या मृतदेहाबद्दल अत्यंत संतापजनक आणि मर्यादाबाह्य भाष्य केले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटिझन्सनी त्या महिला डॉक्टरच्या वैद्यकीय नैतिकतेवर (Medical Ethics) आणि संवेदनशीलतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “डॉक्टर असूनही मृतदेहाचा असा अनादर करणे अत्यंत क्लेशदायक आहे,” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. अनेकांनी या शोच्या दर्जावर आणि अशा प्रकारच्या क्युरेटेड कंटेंटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

इंटरनेटवर संमिश्र प्रतिक्रिया

तरुणावरील कारवाईनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा दोन गट पडले आहेत. त्यात एका गटाने या कारवाईचे समर्थन केले. बहुतांश नेटकऱ्यांनी कंपनीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. लोकांच्या मते, “मुलींबद्दल अशी विकृत आणि अश्लील मानसिकता ठेवणाऱ्यांना असा धडा मिळणे गरजेचे होते, जेणेकरून भविष्यात कोणीही असे वक्तव्य करण्याचे धाडस करणार नाही.” काही लोकांनी असेही म्हटले की, ‘केवळ एका कॉमेडी शोमध्ये केलेल्या विधानामुळे किंवा चुकीच्या वक्तव्यामुळे एखाद्याची नोकरी घालवणे आणि त्याला उघड्यावर पाडणे (Public Shaming) जरा अतिरेकी ठरले.’

झोमॅटोचा कथित स्क्रीनशॉट व्हायरल

सोशल मीडियावर झोमॅटोचे एक कथित नोटिफिकेशन वेगाने व्हायरल झाले होते, ज्यामध्ये लिहिले होते, “Biryani bhejdu? Rs 370 ki hai bas” (बिर्याणी पाठवू का? फक्त ३७० रुपयांची आहे). हा स्क्रीनशॉट अशा वेळी समोर आला जेव्हा ‘370 रुपयांची बिर्याणी’ हा वाद इंटरनेटवर चर्चेचा मोठा विषय बनला होता आणि अनेक ब्रँड्स, इन्फ्लुएन्सर्स, सेलिब्रिटी आणि संस्था या वादाचा भाग बनत होते. इंटरनेटवर मीम्स, पॅरोडी पोस्ट आणि अनेक ब्रँड्सचे बनावट स्क्रीनशॉट व्हायरल होऊ लागले. याच दरम्यान झोमॅटोच्या नावानेही हा स्क्रीनशॉट पसरवला गेला होता.

झोमॅटोचे LinkedIn वर स्पष्टीकरण

झोमॅटोने लिंक्डइन (LinkedIn) वर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, ‘एक महत्त्वाचे स्पष्टीकरण.’ यासोबत कंपनीने काळ्या रंगाच्या बॅकग्राउंडवर लिहिलेला एक संदेश शेअर केला, ‘Biryani is dinner, not consent’ (बिर्याणी म्हणजे फक्त रात्रीचे जेवण आहे, सहमती नाही). कंपनीने पुढे म्हटले आहे की, ‘सोशल मीडियावर त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले आक्षेपार्ह नोटिफिकेशन पूर्णपणे बनावट आहे आणि ते कंपनीने लिहिलेले किंवा पाठवलेले नाही.’

मुंबई पोलिसांची पोस्ट

'बिर्याणी म्हणजे सहमती नव्हे!': 370 रुपयांच्या बिर्याणीवरून प्रणित मोरेची माफी, तरुण नोकरीवरून बडतर्फ, मुंबई पोलिस-झोमॅटोही मैदानात, वाचा पूर्ण स्टोरी

प्रणित मोरे आणि ₹३७० ची बिर्याणी या वादाचे पडसाद आता थेट मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया पेजवर उमटले आहेत. जनजागृती करण्यासाठी नेहमीच धारदार, समकालीन आणि विनोदी पोस्ट टाकण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई पोलिसांनी या ‘सहमती’च्या (Consent) वादावर इन्स्टाग्रामवर एक कडक पोस्ट शेअर केली, जी अल्पावधीतच व्हायरल झाली. या पोस्टमध्ये एक स्वच्छ पांढरा ग्राफिक फोटो होता, ज्यावर मोठ्या अक्षरात ₹३७० लिहिले होते आणि ‘०’ च्या जागी बिर्याणीची प्लेट दाखवण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी या चित्रावर लिहिले, “तुम्हाला ₹३७० मध्ये बिर्याणीची प्लेट मिळते. आमच्या लॉक-अपमध्ये जास्त वेळ घालवल्यास मोफत जेवण मिळते.” पोस्टच्या शेवटी पोलिसांनी #BiryaniIsNotConsent (बिर्याणी म्हणजे सहमती नव्हे) हा हॅशटॅग देखील वापरला. काहींनी या पोस्टकडे विनोदी अंगाने पाहिले, तर काही युजर्स यामुळे पोलिसांवर संतापले देखील.

प्रणित मोरेला सलमान खाननेही दिला होता इशारा

स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या त्याच्या शोमधील ‘370 रुपयांची बिर्याणी’ आणि महिलांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पण, त्याच्या या बेजबाबदार वागणुकीचा हा पहिलाच प्रसंग नाही. याआधी ‘बिग बॉस 19’ (Bigg Boss 19) मध्ये बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याने त्याला त्याच्या या उथळपणाबद्दल कडक शब्दांत ताकीद दिली होती. प्रणित मोरेच्या बोलण्याच्या पद्धतीवर आणि पोरकटपणावर सलमान खानने त्याला ‘विकेंड का वार’मध्ये चांगलेच सुनावले होते. सलमानने त्याला स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, अशा प्रकारची वर्तणूक त्याला महागात पडू शकते.

हक्क गाजवण्याच्या वृत्तीचा निषेध

प्रणित मोरेची मैत्रिण आणि अभिनेत्री मालती चहरने या घटनेचा निषेध करत म्हटले आहे की, “नातेसंबंध आणि डेटिंग हे एकमेकांचा आदर आणि भावनिक जवळीक यावर आधारलेले असतात. कोणत्याही मुलीला डेटवर नेऊन तिच्यावर पैसे खर्च केले, म्हणजे तिच्यावर किंवा तिच्या सहमतीवर (Consent) तुमचा हक्क निर्माण होत नाही.” तिने पुढे स्पष्ट केले की, “३७० रुपये असो वा मोठी रक्कम, कोणत्याही मुलीची सहमती किंवा तिचा आदर हा पैशांनी विकत घेतला जाऊ शकत नाही. अशा प्रकारची व्यावहारिक आणि विकृत मानसिकता आधुनिक समाजात अत्यंत चुकीची आहे आणि तिला प्रोत्साहन दिले जाऊ नये.” तिने या संपूर्ण प्रकरणातील ‘हक्क गाजवण्याच्या’ (Entitlement) वृत्तीचा निषेध केला असून सहमतीच्या महत्त्वावर भर दिला आहे.

‘हा शो त्वरित बंद झाला पाहिजे’ – रश्मी देसाई

बिग बॉस फेम अभिनेत्री रश्मी देसाईने या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त करत हा शो बंद करण्याची मागणी केली आहे. ती म्हणाली, “हे अत्यंत लज्जास्पद आणि संतापजनक आहे. विनोदाच्या नावाखाली कोणाच्याही भावनांशी खेळण्याचा किंवा महिलांचा आणि मृतदेहांचा असा अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही. प्रशासनाने अशा शोवर त्वरित कारवाई करून हा शो कायमचा बंद केला पाहिजे.”

‘370रुपयांत महिलेच्या शरीरावर तुमचा हक्क?’ – आयशा खान

शोमधील ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ आणि महिलांच्या संदर्भातील आक्षेपार्ह विधानाचा समाचार घेत आयशा खानने थेट सवाल उपस्थित केला आहे. आयशा म्हणाली, “370 रुपये देऊन तुम्ही एखाद्या महिलेच्या शरीरावर किंवा तिच्या अस्मितेवर तुमचा हक्क समजता का?” “विनोदाची एक पातळी असते, पण इथे सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. हे अजिबात सहन करण्यासारखे नाही.”

लज्जास्पद आणि किळसवाणे

अभिनेत्री अपू्र्वा नेमळेकरणे हे प्रकरण लज्जास्पद आणि किळसवाणे असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिलीय. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “मी नुकतीच प्रणित मोरेच्या शोमधील एक व्हायरल क्लिप पाहिली आणि मला अत्यंत तीव्र संताप व तिटकारा आला आहे.

एक माणूस डेटनंतर “वसुली” करण्यासाठी आपल्या जोडीदारावर (पार्टनरवर) त्याने स्वतःला कसे बळजबरीने लादले, हे अत्यंत अभिमानाने सांगत आहे; आणि तथाकथित “पुरुषांनी” भरलेली संपूर्ण खोली त्यावर एकत्र हसत आहे?

ही कोणतीही “डार्क कॉमेडी” (Dark comedy) नाही, तर हा बळजबरी आणि ‘हक्क गाजवण्याच्या’ मानसिकतेचे अत्यंत लाजीरवाणे सामान्यीकरण आहे. त्या प्रेक्षकांमध्ये बसून हसणारे ते लोक अजिबात पुरुष नाहीत, तर ते समाजाला लागलेली कीड (परजीवी) आहेत.

प्रेक्षक म्हणून आता आपल्याला जागे होण्याची आणि नेमके खरे मनोरंजन काय आहे, हे समजूतदारपणे निवडण्याची गरज आहे. अशा विषारी (Toxic) लोकांना स्टेज देणे आणि त्यांना सोशल मीडिया स्टार बनवणे बंद करा. त्यांच्यावर उघडपणे टीका करा आणि त्यांच्यावर बंदी घाला.”

साऱ्यांसाठीच एक धडा

प्रणित मोरेच्या शोमधला हा वाद आता केवळ एका ‘हॉटेलातील बिला’पुरता किंवा ‘कॉमेडी शो’पुरता मर्यादित राहिलेला नाही. या घटनेने हे सिद्ध केले आहे की, डिजिटल युगात तुम्ही सार्वजनिक ठिकाणी महिलांबद्दल काय बोलता, याला प्रचंड महत्त्व आहे. 370 रुपयांच्या बिर्याणीच्या बदल्यात हक्क मागणाऱ्या या तरुणाला, त्याची ही एक अश्लील टिप्पणी थेट नोकरी गमावण्यास कारणीभूत ठरली आहे. आधुनिक समाजात महिलांचा आदर न करणाऱ्या आणि नात्याला ‘व्यवहार’ समजणाऱ्यांसाठी हा एक मोठा इशारा मानला जात आहे

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp