अन्यथा नगरसेवक अनिल अग्रवाल उपोषण करणार: गैरव्यवहारांविरोधात समिती गठित करण्याची मागणी‎ – Akola News

अन्यथा नगरसेवक अनिल अग्रवाल उपोषण करणार:  गैरव्यवहारांविरोधात समिती गठित करण्याची मागणी‎ – Akola News



तत्कालिन महानगर पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी आमसभेत ठरल्याप्रमाणे समितीचे गठन करण्यात यावे, अन्यथा आपण मनपा मुख्यालयात बेमुदत उपोषण करू, असा इशारा काँग्रेसचे नगरसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार अनिल अग्रवाल यांनी महापौर श्रीचंद तेजवानी यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या आमसभेत नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी तत्कालिन आयुक्त आष्टीकर यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर काँग्रेससह सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रकरणी चौकशी समिती गठित करण्याची एकमुखी मागणी करीत तसा ठरावी केला होता. परंतु, सुमारे दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप महानगर पालिकेद्वारे चौकशी समितीचे गठन तर सोडाच यासंदर्भात हालचालही नाही. ते बघता नगरसेवक अग्रवाल यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. या १५ दिवसांच्या कालावधीत जर चौकशी समिती स्थापन झाली नाही तर आपण मनपा मुख्यालयात बेमुदत उपोषण सुरू करू असा अल्टीमेटमही त्यांनी दिला आहे. या प्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश रतावा, भेले उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp