पं. श्रीकांत देशपांडे जयंतीनिमित्त विशेष संगीतसंध्या: पं. उल्हास कशाळकर, श्रुती विश्वकर्मा यांच्या गायनाने मैफल रंगली – Pune News

पं. श्रीकांत देशपांडे जयंतीनिमित्त विशेष संगीतसंध्या:  पं. उल्हास कशाळकर, श्रुती विश्वकर्मा यांच्या गायनाने मैफल रंगली – Pune News



ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या रागत्रयीने आणि युवा गायिका श्रुती विश्वकर्मा यांच्या दमदार मधुवंती रागाने पुणेकरांनी एका अविस्मरणीय संगीत मैफिलीचा अनुभव घेतला. पं. श्रीकांत देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष संगीतसंध्येने रसिकांना मंत्रमुग्ध केले. श्रीकांत देशपांडे मित्रमंडळाच्या वतीने या ‘संगीतसंध्या’ मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. हा या उपक्रमाचा १४ वा वर्धापनदिन होता. या मैफिलीद्वारे पं. श्रीकांत देशपांडे आणि ज्येष्ठ हार्मोनिअमवादक पं. आप्पासाहेब जळगावकर यांच्यातील विशेष स्नेहबंधाचे स्मरण करण्यात आले. पं. जळगावकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ही संगीतसंध्या त्यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आली. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या मैफिलीची सुरुवात युवा गायिका श्रुती विश्वकर्मा यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मधुवंती सादर केला. यात ‘तोरे गुन गाऊ’ हा विलंबित त्रितालातील पारंपरिक ख्याल, मध्यलय त्रितालातील ‘काहे मान करो’ आणि आडाचौतालात निबद्ध तराणा यांचा समावेश होता. श्रुती यांनी गुरू बसवेश्वर यांच्या झपतालात बांधलेल्या कानडी दासवचनाचे सादरीकरण करत आपल्या गायनाला विराम दिला. त्यांच्या उत्तम दमसास, सुरेलता आणि शिस्तबद्ध सादरीकरणामुळे रसिकांनी त्यांना भरभरून दाद दिली. यावेळी मनोगत व्यक्त करताना श्रुती विश्वकर्मा म्हणाल्या की, या मैफिलीत गाण्यासाठी बोलावले जाणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्या गायनाचा श्रीगणेशा किराणा घराण्यापासूनच झाला असून, या परंपरेची सेवा करण्याची ही एक संधी मी समजते. मधुवंती हा पं. श्रीकांत देशपांडे यांचाही आवडता राग होता, हे समजल्याने तोच राग सादर केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना तबल्यावर भरत कामत, हार्मोनिअमवर उपेंद्र सहस्रबुद्धे, तर तानपुऱ्यावर अधीश्री पोटे आणि तेजल कुलकर्णी यांनी साथसंगत केली. मैफिलीच्या उत्तरार्धात ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांनी आपल्या सिद्धहस्त गायनाने रसिकांना खिळवून ठेवले. त्यांनी कामोद रागात ‘मती मालनिया’ हा झुमरा तालातील पारंपरिक ख्याल आणि त्याला जोडून द्रुत त्रितालातील ‘जाने ना दूंगी’ ही रचना सादर केली. त्यानंतर सोहनी पंचम रागात पं. दिनकर कायकिणी रचित ‘लंगर तोरे’ ही बंदिश प्रस्तुत केली. ज्येष्ठ गायक मा. कृष्णराव यांनी रचलेल्या ‘शिवकल्याण’ रागातील रूपक तालातील ‘माई प्रीतम करो’ ही बंदिश पेश करत पं. कशाळकर यांनी या विलक्षण संगीत संध्येची सुरेल सांगता केली. कामोद, सोहनी पंचम आणि शिवकल्याण या अनवट रागत्रयीने रसिकांना आगळावेगळा श्रवणानंद दिला. पं. उल्हास कशाळकर यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी तबल्यावर, सुयोग कुंडलकर यांनी हार्मोनिअमवर, तर निर्भय सक्सेना आणि साईऐश्वर्य महाशब्दे यांनी तानपुरा व स्वरसाथ करत मैफिलीची रंगत वाढवली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp