
पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. कृषी मंत्र्यांकडून चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी कर्जमाफीतील जाचक अटी हटवून सर्व शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची विनाअट कर्जमाफी जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायासाठीचा हा लढा आता थांबणार नाही.. “माझे वडील, पत्नी आणि मुलं भावुक झाली आहेत. मुलं ‘बाबा लवकर घरी या’ असा निरोप देत आहेत, पण अन्नदात्याच्या न्यायासाठीचा हा लढा आता थांबणार नाही, असे रोहित पवार म्हणाले. मनोज जरांगे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते आणि इतर पक्षांचे नेते आंदोलनस्थळी येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च करता, मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अटी का? असा सवाल करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. प्रशासनाच्या शिष्टमंडळाने घेतली रोहित पवारांची भेट पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनस्थळी प्रशासनाच्या शिष्टमंडळाने भेट देत रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी कृषीमंत्री दत्तामामा भरणे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्कही घडवून आणण्यात आला. मंत्र्यांनी पुढील दोन-तीन दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन दिले असले, तरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याबाबत सरकारकडून सार्वजनिक आणि ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका रोहित पवार यांनी स्पष्ट केली. शेतकऱ्यांमध्ये या अटींविरोधात तीव्र संताप असून बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा दावा त्यांनी केला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही विविध भागांतून शेतकरी संघटना आणि नागरिकांचा पाठिंबा मिळत असून सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नसल्याने रोहित पवार यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “अन्नदात्याच्या न्यायासाठी सुरू केलेला हा लढा असून, विनाअट सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत माघार नाही,” अशी भूमिका रोहित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. चर्चा विलीनीकरणाची, तयारी राजकीय महाभूकंपाची?:शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह TMCला ऑफर! काय होणार देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर परिणाम? भारताच्या राजकारणात सध्या एका मोठ्या घडामोडीची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचे प्रादेशिक पक्ष स्थापन करणाऱ्या नेत्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ किंवा त्यांच्या पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हे खरोखरच घडले, तर देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होतील. या सर्व संभाव्य राजकीय घडामोडींचा आणि इतिहासाचा घेतलेला हा सविस्तर आढावा. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
