वेरूळ येथील शिक्षक मृत्यू प्रकरण: पोलिसांनी लाथा मारल्याने हृदयविकाराचा ‎झटका येऊन शिक्षक बोरसे यांचा मृत्यू – चंद्रकांत खैरे – Chhatrapati Sambhajinagar News

वेरूळ येथील शिक्षक मृत्यू प्रकरण:  पोलिसांनी लाथा मारल्याने हृदयविकाराचा ‎झटका येऊन शिक्षक बोरसे यांचा मृत्यू – चंद्रकांत खैरे – Chhatrapati Sambhajinagar News



पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली शिक्षक‎ सुरेश बोरसे यांच्या छातीवर लाथा‎ मारल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका‎ आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.‎ पोलिसांनी आरोपींवर खुनाचे ३०२ कलम‎का लावले नाही? याची मी वरिष्ठ‎ पातळीवर चौकशी करणार आहे. तसेच‎ आरोपींना तात्काळ जामीन मिळण्यामागे‎ मोठी लिंक असून, राजकीय दबावाची‎ चौकशी करण्यास भाग पाडू, असे माजी‎ खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.‎ ‘मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख‎ हत्याकांडासारखी परिस्थिती झाल्याचे‎ नमूद केले. न्याय न मिळाल्यास आरोपींना ‎त्यांच्या गावातून पिटाळून लावू,’ असा थेट ‎इशारा त्यांनी एएसपी अपराजिता‎ अग्निहोत्री यांना दिला.‎ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)‎ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून ‎माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रविवारी‎ बोरसे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.‎ तसेच कायदेशीर लढ्यात सोबत राहण्याचे‎आश्वासन दिले. या घटनेनंतर हळूहळू‎दोषींवर कारवाईसाठी दबाव वाढत आहे.‎त्यामुळे पोलिसांनी घटनेतील दोषी पोलिस‎अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे‎गुन्ह्यात नोंदवावी, अशी मागणी शिक्षक‎ संघटनांनी केली आहे.‎ खुनाचा गुन्हा दाखल‎ व्हावा : शिक्षक संघटना‎ दोषींवर ३०२ गुन्हा दाखल होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा‎ निर्धार शिक्षक संघटनांनी केला‎आहे. शिक्षक बोरसे हे धार्मिक‎व सामाजिक क्षेत्रात कार्यरत‎ व्यक्तिमत्त्व होते. महाविकास आघाडी गृह विभागाला धारेवर ‎धरण्याच्या तयारीत आहे. या‎ पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री‎ अतुल सावे व आमदार प्रशांत‎ बंब हे देखील आज वेरूळला‎ बोरसे यांच्या कुटुंबीयांची भेट ‎घेणार आहेत.‎ कुटुंबाला उद्ध्वस्त करणाऱ्यांना शिक्षा करा : मृताची आई‎ माजी खासदार खैरे यांनी बोरसे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तेव्हा मृत शिक्षक ‎बोरसे यांच्या आई मालतीबाई बोरसे यांनी टाहो फोडला. “माझ्यासाठी माझा‎डोंगर गेला… कुटुंबाला उद्ध्वस्त करणाऱ्यांना कडक शिक्षा होऊन न्याय‎मिळावा,’ अशी विनंती त्यांनी केली. यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.‎ दोषींवर कठोर कारवाई करावी : आमदार काळे‎ शिक्षक बोरसे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने‎ कठोर कारवाई करावी, अशी ‎मागणी आमदार विक्रम काळे यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे ‎निवेदनाद्वारे केली आहे. या गंभीर‎ प्रकरणाची तातडीने दखल घेऊन ‎सर्व संबंधित आरोपींना तात्काळ‎ अटक करावी, असे त्यांनी निवेदनात ‎नमूद केले आहे. यासंदर्भात त्यांनी ‎पोलिस अधिकाऱ्यांशी फोनवर‎ संवाद साधून या प्रकरणाची‎ सविस्तर माहिती घेतली.‎ पीएसआय नागरगोजेंसह ‎इतरांची चौकशी सुरू‎ प्रकरणातील व्हिडिओत आरोपी दिसत‎असले तरी, घटनेच्या दुसऱ्या दिवशी‎सकाळी ९ वाजताच तक्रार नोंदवली आहे.‎कायदेशीर प्रक्रियेनुसार सुरुवातीला‎अनोळखी व्यक्ती असा उल्लेख करावा‎लागला. तपासादरम्यान जे संशयित‎निष्पन्न झाले आहेत, त्यांची नावे गुन्ह्यात‎समाविष्ट केली आहे. उपनिरीक्षक‎नागरगोजे व इतर कर्मचाऱ्यांची चौकशी‎सुरू आहे. कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध‎झाल्यास किंवा ते दोषी आढळल्यास‎कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.‎ – प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक, ग्रामीण‎ व्हिडिओ फुटेजआधारे तपास -अग्निहोत्री‎ गेल्या चार दिवसांपासून फॉरेन्सिक टीम, प्रत्यक्षदर्शींचे जबाब‎ आणि मोबाईल व्हिडिओ फुटेजच्या आधारे तपास सुरू‎असून, पुरावे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. आरोपींना‎सूट न देता तात्काळ न्यायालयात चार्जशीट दाखल केली‎ जाईल, असे एएसपी अपराजिता अग्निहोत्री यांनी सांगितले.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp