सिनेरसिकांसाठी मोठी पर्वणी!: ‘MIFF 2026’ निमित्त मुंबईत रंगणार 19 निवडक मराठी लघुपट आणि माहितीपटांचा महोत्सव – Mumbai News

सिनेरसिकांसाठी मोठी पर्वणी!:  ‘MIFF 2026’ निमित्त मुंबईत रंगणार 19 निवडक मराठी लघुपट आणि माहितीपटांचा महोत्सव – Mumbai News



मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) २०२६ च्या निमित्ताने महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील निवडक १९ लघुपट आणि माहितीपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दिनांक १६ ते २० जून दरम्यान पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात नियमित संध्याकाळी ६.३० वाजता महोत्सव रंगणार आहे. केवळ १९ जून रोजी ४ ते ६ वाजेपर्यंत प्रदर्शन करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. माहितीपट व लघुपट वेळापत्रक खालील प्रमाणे : – मंगळवार, 16 जून 2026 1. मायबाचे आशिर्वाद- लघुपट 2. मेतकूट – लघुपट 3. नेहमीच – लघुपट 4. फड- माहितीपट बुधवार, 17जून 2026 1. वेणी – लघुपट 2. जास्वंद- लघुपट 3. पॅम्पलेट- लघुपट 4. महाल्ले- माहितीपट 5. अर्जुन- लघुपट गुरुवार, 18 जून 2026 ब्रह्मकमळ- लघुपट गढूळ- लघुपट डीयर २०२- लघुपट १७ वे वर्ष- लघुपट फड- माहितीपट शुक्रवार, 19 जून 2026 पाणखोल- लघुपट अर्जुन- लघुपट डोंगर पाणी-लघुपट दारवठा‐लघुपट शनिवार, 20 जून 2026 वाघ-लघुपट सापशिडी- लघुपट मुक्ता- लघुपट दारवठा- लघुपट मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदित आणि कसलेल्या दिग्दर्शकांच्या उत्कृष्ट कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्या चोखंदळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त चित्रपट रसिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp