ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन बाजार: खासदारांच्या खरेदीचा रेट 85 कोटी? एवढे पैसे येतात तरी कुठून? – रोहित पवारांचा सवाल – Maharashtra News

ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन बाजार:  खासदारांच्या खरेदीचा रेट 85 कोटी? एवढे पैसे येतात तरी कुठून? – रोहित पवारांचा सवाल – Maharashtra News



‘ऑपरेशन टायगर’ आणि ठाकरे गटाच्या खासदार खरेदी-विक्रीच्या चर्चांवरून आता महाविकास आघाडीतील इतर नेतेही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सत्ताधारी महायुतीवर आणि बंडखोर खासदारांवर थेट शब्दांत प्रहार केला आहे. हा प्रकार म्हणजे अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार आहे, अशा शब्दांत रोहित पवारांनी आपला संताप व्यक्त केला आहे. हा ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन बाजार – पवार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये लोकशाहीच्या सद्यस्थितीवर बोट ठेवत लिहिले, “लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं… हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही तर ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल. आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे आता लोकंच ठरवतील. एकेका खासदाराचा रेट 85 कोटी..? संजय राऊतांनी 50 कोटींच्या डीलचा दावा केला असताना, रोहित पवारांनी हा आकडा आणखी पुढे नेला आहे. त्यांनी थेट सवाल उपस्थित करत विचारले, एकेका खासदाराचा रेट 85 कोटी..? एवढे पैसे द्यायला संबंधित पक्षाकडं पैसे येतात तरी कुठून? शिवसेना, राष्ट्रवादी, आप, तृणमूल काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना.. देशात हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस लोकंच रस्त्यावर उतरून पळून जाणाऱ्यांना आणि पळवून नेणाऱ्यांना चोपल्याशिवाय राहणार नाहीत.” सामान्य माणूस अडचणीत, पण चर्चा फक्त खरेदी-विक्रीची राज्यातील मुख्य मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना रोहित पवार म्हणाले की, आज महाराष्ट्राच्या डोक्यावर दुष्काळाचं सावट आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, बेरोजगारी वाढलीय, नोकरभरतीचा बट्ट्याबोळ झालाय आणि मध्यमवर्गीयांना ईएमआय (EMI) भरण्यासाठी पैसे नाहीत. सामान्य माणूस कधी नाही एवढा अडचणीत असताना यावर मात्र कोणतीही चर्चा होत नाही, हे राज्याचे मोठे दुर्दैव आहे. ठाकरेंचे 6 खासदार फुटले!:लोकसभा अध्यक्षांची उबाठाच्या नव्या स्वतंत्र गटाला मंजुरी, विलीनीकरणाचा मार्ग मोकळा, संजय राऊतांची ओम बिर्लांसोबत बैठक सुरू महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’ला अखेर यश आल्याचे चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी केलेल्या हालचालींना लोकसभा स्तरावर मान्यता मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासंदर्भातील अर्ज मंगळवारीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केला होता. सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp