उपराजधानीमध्ये सुरू काय?: नागपूरमध्ये साडेपाच महिन्यांत 8.49 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; 247 गुन्ह्यांमध्ये 320 तस्करांना बेड्या – Nagpur News

उपराजधानीमध्ये सुरू काय?:  नागपूरमध्ये साडेपाच महिन्यांत 8.49 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; 247 गुन्ह्यांमध्ये 320 तस्करांना बेड्या – Nagpur News



नागपूर शहराला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गेल्या साडेपाच महिन्यांत नागपूर पोलिसांनी ८.४९ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. १ जानेवारी ते १५ जून २०२६ या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत २४७ गुन्हे दाखल करून ३२० आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक कारवाया गांजा आणि मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात झाल्या आहेत. गांजा तस्करीचे ४० गुन्हे दाखल करून ७० आरोपींना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरमध्ये नशेखोरी आणि गुन्हांना कधी चाप लागणार, असा सवाल केला जातोय. ज्यात १.४४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा ५८५ किलो ९६५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. एमडी ड्रग्जविरोधात ३७ गुन्हे दाखल करून ६० तस्करांना अटक करण्यात आली. यात ९ किलो २६३ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ४.१९ कोटी रुपये आहे. गांजा आणि एमडी व्यतिरिक्त, पोलिसांनी एलएसडी आणि डोडा यांसारख्या अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यातही यश मिळवले आहे. एलएसडी आणि डोडा तस्करीचा प्रत्येकी एक गुन्हा दाखल करून प्रत्येकी दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १७० मिलीग्रॅम एलएसडी आणि २४९ ग्रॅम डोडा जप्त करण्यात आला. या कारवाईत अंमली पदार्थांव्यतिरिक्त, तस्करीसाठी वापरलेली वाहने, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण २.८४ कोटी रुपयांचा अतिरिक्त मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांव्यतिरिक्त, त्यांचे सेवन करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या साडेपाच महिन्यांत अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरोधात १६८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात १८६ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp