सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक: महायुती एकसंघ, विरोधकांचीच मते फुटतील – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले – Kolhapur News

सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक:  महायुती एकसंघ, विरोधकांचीच मते फुटतील – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले – Kolhapur News



महायुतीचे मतदार आहेत त्यापेक्षा जास्त मतदान घेऊन भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम हे विजयी होतील असा विश्वास व्यक्त करताना महाविकास आघाडीचेच मतदार फुटण्याची खात्री सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपचे नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. आज दुपारी सातारा येथे सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानाची पाहणी करण्यासाठी उमेदवार धैर्यशील कदम तसेच खासदार उदयनराजे भोसले यांच्या समवेत शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी भाजप तसेच महायुतीतील अन्य दोन पक्ष यांच्या दरम्यान झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे असे विचारले असता शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, “महायुती म्हणून आम्ही सर्व पक्ष एकसंघ आहोत.” उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार कुठून त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याच्या बातम्यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारला असता शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, “त्या पक्षातील फुटी बाबत व खासदारांच्या नाराजीबाबत भाजपाला दोष देण्यात काय अर्थ आहे ? आमचा त्याच्याशी काही संबंध नाही असे आमच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. स्वतःच अपयश झाकून ते दुसऱ्यावर ढकलण्याचा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उद्योग बंद करावा आपले खासदार का नाराज आहेत याचे उत्तर शोधावे.”

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp