ज्येष्ठांसाठी ‘आएस्का’ मोबाईल ॲपचे लोकार्पण: हे ॲप मदतनीस ठरेल, पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांचा विश्वास – Pune News

ज्येष्ठांसाठी ‘आएस्का’ मोबाईल ॲपचे लोकार्पण:  हे ॲप मदतनीस ठरेल, पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांचा विश्वास – Pune News



ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ‘ऑल आयकॉनिक सिनिअर सिटिझन्स असोसिएशन’ (एआयएससीए) या संस्थेने विकसित केलेल्या ‘आएस्का’ मोबाईल ॲपचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांनी या ॲपचे महत्त्व अधोरेखित करत, हे ज्येष्ठांसाठी एक महत्त्वाचा मदतनीस ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम येथे आयोजित कार्यक्रमात हे ॲप लाँच करण्यात आले. वृद्धत्व हा शाप नसून अनुभवाचे मधुर फळ देणारा वृक्ष आहे. मात्र, आजच्या सामाजिक परिस्थितीत ज्येष्ठांना येणारे एकटेपण दूर करण्यासाठी एका साथीदाराची गरज असते, असे डॉ. प्रभुणे म्हणाले. ‘आएस्का’ ॲप ही गरज पूर्ण करेल आणि प्रत्यक्ष गरजेच्या वेळी मदत मिळाल्यास त्यांना आधार वाटेल, असेही त्यांनी नमूद केले. या लोकार्पण सोहळ्याला उद्योजक कृष्णकुमार गोयल, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, उद्योजक अरविंद बुधाणी, आपलं घरचे विजय फळणीकर, नगरसेवक प्रशांत जगताप, दिलीप पवार, उद्योजक एम. ए. तेजाणी, डॉ. सुभाष धिंग्रा, लोकमान्य हास्ययोगचे डॉ. प्रसाद आंबीकर, ॲड. प्रमोद आडकर उपस्थित होते. असोसिएशनच्या संस्थापक व संचालिका शकीला शेख, डॉ. किशोर सरपोतदार, सुनीला कवीटकर, सुहास घोडके, रवींद्र शाळू, अजित कुमठेकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी बोलताना कृष्णकुमार गोयल म्हणाले की, ‘आएस्का’ ॲप ज्येष्ठांसाठी अत्यंत उपयुक्त असून, हे तंत्रस्नेही साधन त्यांना विश्वास आणि मदतनीस ठरेल. ही संकल्पना काळाची गरज असून, यामुळे ज्येष्ठ नागरिक सुरक्षित अनुभवतील. प्रशांत जगताप यांनी बदलत्या कुटुंब पद्धतीमुळे अशा तंत्रज्ञानाची गरज अधोरेखित केली, तर विजय फळणीकर यांनी या ॲपमुळे वृद्धांना साथीदार मिळतील, हे एक पुण्यकर्म असल्याचे सांगितले. असोसिएशनच्या संस्थापक व संचालिका शकीला शेख यांनी ॲपची माहिती दिली. हे मोबाईल ॲप ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासार्ह साथीदार ठरणार आहे. यात आपत्कालीन मदत, सुरक्षितता सूचना, सामाजिक सहभाग, डिजिटल सहाय्य, आरोग्यविषयक माहिती, संपर्क व्यवस्था आणि एका क्लिकवर मदत मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे ॲप ज्येष्ठांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp