
शिवसेना ठाकरे गटातील दुसऱ्या मोठ्या संभाव्य बंडामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपली आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. कोलकात्
.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांच्या चौकडीवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे हे त्यांच्या प्रकृतीच्या कारणांमुळे कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आपण समजू शकतो. मात्र, त्यांच्या आजूबाजूला जे अत्यंत अहंकारी लोक बसले आहेत, त्यांच्या उद्धट वागणुकीमुळेच पक्षातील जुने, निष्ठावान कार्यकर्ते आणि मोठे नेते आज त्यांना सोडून जाण्याचा निर्णय घेत आहेत.”
‘ऑपरेशन टायगर’च्या यशावर ठाकरेंकडूनच शिक्कामोर्तब
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात गाजत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’वरही प्रतापराव जाधव यांनी मोठे भाष्य केले. “कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी जी अत्यंत भावनिक भाषणे केली, त्यावरूनच ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा स्वतः ठाकरे गटानेच अप्रत्यक्षपणे सिद्ध केला आहे. त्यांच्या भाषणातून दिसणारी हतबलता आणि उद्वेग बरंच काही सांगून जातो,” असा टोला त्यांनी लगावला.
६ खासदारांना खुली ऑफर; ओमराजे निंबाळकरांचा उल्लेख
पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाच्या निकालावर बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की, हा निकाल थेट न्यायालयाने दिला असल्याने त्यावर आता कोणालाही बोलता येणार नाही. मात्र, याच प्रकरणाशी जोडलेले ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह ६ खासदारांनी आता संसदेत एक वेगळा गट स्थापन केल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी केला.
याबाबत अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले:
“ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी संसदेत स्वतंत्र गट स्थापन केला असून लोकसभा अध्यक्षांनीही त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे हे ६ खासदार आता स्वतःचा राजकीय निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहेत. त्यांनी जर भविष्यात आमच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचे पक्षात मनापासून स्वागतच असेल.”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
