‘उत्कृष्ट सरपंच गाव कारभारी’ पुरस्कार स्नेहल कडू यांना प्रदान: अशोक नगर ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा‎ – Amravati News

‘उत्कृष्ट सरपंच गाव कारभारी’ पुरस्कार स्नेहल कडू यांना प्रदान:  अशोक नगर ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा‎ – Amravati News



अशोक नगर (ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) येथील कर्तृत्ववान महिला सरपंच स्नेहल कडू यांना राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानतर्फे २०२६ चा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय “गाव कारभारी पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार २ जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात प्रदान करण्यात आला. “राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेले’ गाव हेच माझे तीर्थ असा ग्राम विकासाचा ध्यास घेणाऱ्या सरपंचांचा गौरव होणे, ही विकसित महाराष्ट्राची परिभाषा असल्याचे मत महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोंडे यांनी व्यक्त केले. ग्रामविकासाचा ध्यास घेऊन गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सरपंचांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोंडे, संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप काळे, राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश साबळे, प्रगतशील शेतकरी प्रशांत डहाणे, मनोजराव कडू, एपीसीएल ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे संचालक ज्ञानेश्वर काळे, अनुला खान, वीरशीचे सरपंच अमित कुचे, गुरुकुंज मोझरीचे सरपंच सुरेंद्र भिवगडे, सचिन राऊत, संगीता बदरे, नामदेव वैद्य, रुपेश गुल्हाने, सतीश हजारे, प्रीतम घुंगरूड तसेच गुंजी, धाकुलगाव, वीरूळ रोंगे व परिसरातील अनेक सरपंच, मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp