विरोधकांचे 6 पानी पत्र ‘AI’ निर्मित!: चहापानावरील बहिष्कारावरून CM देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला – Mumbai News

विरोधकांचे 6 पानी पत्र ‘AI’ निर्मित!:  चहापानावरील बहिष्कारावरून CM देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला – Mumbai News



राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (दिनांक 20 जून) सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी याहीवेळी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. तीन आठवड्यांचे पूर्ण अधिवेशन प्रस्तावित करण्यात आले आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटावेत या दृष्टीने सकारात्मक चर्चा आणि त्यावर सरकारच्या वतीने योग्य उपाययोजना अशा पद्धतीचे नियोजन करणे हे सरकारी पक्ष म्हणून आम्ही त्याचा प्रयत्न करणार आहोत. आजही आमच्या विरोधी पक्षांनी चहापानावर बहिष्कार टाकला. ते आले असते तर चर्चा झाली असती. पण त्या ऐवजी त्यांनी आम्हाला 6 पानांचे पत्र दिले आहे. यावेळी पत्रावर सह्या दिसत आहेत. तुम्ही पाहिले तर लक्षात येईल की त्यांनी आधीच सगळ्यांच्या सह्या घेतल्या आहेत आणि त्यानंतर 6 पानांचे पत्र जोडले आहे. हरकत नाही. विरोधकांनी पाठवलेले पत्र एआय निर्मित पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण जर हे पत्र पाहिले, तर लक्षात येईल की हे पत्र एआयच्या मदतीने तयार केले आहे. म्हणजे पत्रही तयार करण्यासाठी आता विषय राहिले नाही, कल्पकता राहिली नाही, किंवा प्रश्नांचे आकलन राहिले नाही. पण एका गोष्टीचा मला आनंद आहे की ते टेक्नॉलजीचा उपयोग करत आहेत. आपण सर्वांनीच याचा उपयोग केला पाहिजे. येणारी आव्हाने लक्षात घेत विरोधकांनी आतापासूनच तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केला. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. अल निनोला देखील आमच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस म्हणाले, यावेळी जयंतराव वेळेवर पोहोचले. कारण आपण कनेक्टिंग लिंक तयार केली असल्यामुळे ते कुठेही ट्रॅफिकमध्ये अडकले नाहीत आणि ते पोहोचले. फक्त आता अल निनोला देखील आमच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हे सुद्धा त्यांनी चॅटजीपीटीला विचारले असते तर अशा प्रकारचे स्टेटमेंट त्यांनी केले नसते. आपण पाहिले असेल की भासकारराव अलीकडच्या काळात खूप रागवतात. कालच बघितले असेल की आपले मिलिंद नार्वेकर यांनी 2-4 वेळा हॉर्न वाजवल्यानंतर भासकाररावांनी त्यांचेच ऑपरेशन तुडवा करून टाकले. आमच्यासाठी कर्जमाफी राजकीय विषय नाही एकूणच या पत्रकार परिषदेत कोणताही नवा विषय हा विरोधक मांडू शकले नाहीत. त्यांच्या पत्रातही एक पॅराग्राफ असा आहे तो पॅराग्राफ आधीपासून तोच आहे. म्हणजे त्यावर चर्चा झाली, कारवाई झाली तरी ते अजूनही तेच टाकतात. कारण लोकांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अपेक्षित असे मुद्दे हे विरोधकांना अवगतच नाहीत. आता त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात सुतोवाच केला आहे. मी आधी एक गोष्ट स्पष्ट करतो की समोर कोणत्याही निवडणुका नसताना आम्ही कर्जमाफी केली आहे. केवळ विधानसभाच नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकलेलो आहोत. आमच्यासाठी कर्जमाफी राजकीय विषय नाही. आमच्यासाठी कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घेण्याची ताकद आली पाहिजे, अशा दृष्टीने आम्ही त्याकडे पाहतो. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार यापूर्वीची जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती, तेव्हाही मी सांगितले होते की, कोणत्याही कर्जमाफीने कुठलाही शेतकारी श्रीमंत झाला नाही. पण परिस्थितीनुसार आपल्याला कर्जमाफी करावी लागते. यावेळी आपण एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीला हे काम दिले होते की शॉर्ट टर्मच्या उपाययोजना, लॉन्ग टर्मच्या उपाययोजना बँकिंग सिस्टमवर होणार परिणाम या सगळ्या गोष्टींचा विचार करून रिपोर्ट द्यावा आणि त्यानंतर आपण काही निकष यात टाकले आहेत. आज आपण विचार केला तर 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp