राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक: मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी – Maharashtra News

राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक:  मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी – Maharashtra News



अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर ट्रस्टवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 1 कोटी रुपये आणि चांदीची वीट संजय राऊत यांनी म्हटले आहे की, राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 1 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदतीसह 4 किलो वजनाची पवित्र चांदीची वीट हजारो शिवसैनिक आणि संत-महंतांच्या उपस्थितीत अर्पण केली होती. मात्र, वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या चांदीच्या विटीबाबत कोणतीही अधिकृत पावती किंवा माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आलेली नाही, असा दावा त्यांनी केला. पूर्ण चौकशीची मागणी “ही चांदीची वीट नेमकी कुठे गेली? तिचा वापर कशासाठी झाला? याची माहिती जनतेसमोर यायला हवी. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारी निश्चित केली पाहिजे,” अशी मागणी राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. राम मंदिर ट्रस्टकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर ट्रस्ट काय स्पष्टीकरण देतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… अयोध्येत SIT ने विचारले- हार, चरण पादुका कोणाला दिले: महंत म्हणाले- टिन्नूला दिले; चांदीची वीट देणाऱ्या व्यापाऱ्याने सत्य सांगितले अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात एसआयटी (विशेष तपास पथक) आता अशा देणगीदारांशी संपर्क साधत आहे, ज्यांनी मंदिर ट्रस्टच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला दागिने दिले होते. एसआयटी आपल्या अहवालात हे तथ्य समाविष्ट करेल की कधी आणि कोणाच्या हातात दागिने सोपवले गेले. कोणती पावती दिली होती की नाही. एसआयटीने गुरुवारी (18 जून) मुंबईतील एक व्यावसायिक अनिल विश्वकर्मा यांचे जबाब नोंदवले. व्यवसायिकाचा आरोप आहे, ‘आम्ही रामलल्लासाठी 3 किलो चांदीचा हार आणि 1 किलो चांदीच्या चरण पादुका टिन्नू यादव यांना दिल्या होत्या, पण मंदिराकडून कोणतीही पावती मिळाली नाही.’ सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp