हिंगोलीत गुटख्याची वाहतूक करणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात: एक लाखाचा मुद्देमाल जप्त; शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – Hingoli News

हिंगोलीत गुटख्याची वाहतूक करणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात:  एक लाखाचा मुद्देमाल जप्त; शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – Hingoli News



हिंगोली शहरात दुचाकी वाहनावर बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या पथकाने रविवारी तारीख 28 सायंकाळी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एका दुचाकीसह गुटखा असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती हिंगोली शहरात काहीजण दुचाकी वाहनावर गुटखा वाहतूक करून पानटपरी चालकांना देत असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पथक मागील दोन दिवसापासून चालकाच्या पाळतीवर होते. दरम्यान आज सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉ श्रेणीक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना , पोलीस उपाधीक्षक कुंदनकुमार वाघमारे, हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांचे मार्गदर्शन खाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, गणेश लेकुळे, मोहसीन शेख , संदीप सोनटक्के यांच्या पथकाने शहरात सापळा रचून एका दुचाकी वाहन चालकाला थांबवले. पोलिसांना पाहताच दुचाकी वाहन चालकाची घाबरगुंडी उडाली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मोहम्मद समीर असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये काय आहे याची विचारणा केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी पिशवीची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळून आला. पोलिसांच्या पथकाने पस्तीस हजार रुपये किमतीचा गुटखा व दुचाकी वाहन असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी मोहम्मद समीर यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याने गुटखा कुठून आणला तसेच कोणासाठी आणला होता याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp