बीएलओच्या संपर्कासाठी हिंगोली उपविभागात कम्युनिकेशन प्लॅन: एका क्लिकवर होणार संपर्क; एसडीएम समाधान घुटुकडे यांचा पुढाकार – Hingoli News

बीएलओच्या संपर्कासाठी हिंगोली उपविभागात कम्युनिकेशन प्लॅन:  एका क्लिकवर होणार संपर्क; एसडीएम समाधान घुटुकडे यांचा पुढाकार – Hingoli News



हिंगोली उपविभागामध्ये निवडणूक विभागाच्या आदेशानुसार मतदार विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत युद्ध पातळीवर काम सुरू झाले असून बीएलओच्या संपर्कासाठी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या पुढाकारातून क्विक कम्युनिकेशन प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामध्ये सर्व बीएलओची यादी तयार करण्यात आली असून त्यांचे संपर्क क्रमांक नमूद करण्यात आले आहे. या क्रमांकावर क्लिक केल्यानंतर लगेचच त्यांच्याशी संपर्क होणार आहे. या क्विक कम्युनिकेशन प्लॅन मुळे बीएलओं सोबत संपर्क साधणे सहज शक्य होणार आहे. संपूर्ण देशभरामध्ये मतदार विशेष पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरू आहे. हिंगोली उपविभागात उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, कळमनुरी उपविभागात उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भूते, होते तर वसमत उपविभागात उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. त्यासाठी उपविभागाचे सर्व मतदानकेंद्रासाठी बीएलओ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यामार्फत स्थानिक पातळीवर कामे केली जात आहेत. त्यानुसार केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या भेटी घेऊन माहिती घेत आहेत. यामध्ये मतदारांशी संपर्क न झाल्यास पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांच्याशी संपर्क केला जात आहे. दरम्यान मतदारांनाही बीएलओ सोबत संपर्क साधण्यासाठी त्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. हिंगोली मध्ये उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील 343 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले. या अधिकाऱ्यांची संपूर्ण यादी तयार केली आहे. या यादी मध्ये आपापल्या बिएलओ सोबत संपर्क साधण्यासाठी त्या यादीवरील अधिकाऱ्याच्या नावासमोर क्लिक केल्यानंतर तातडीने अधिकार्‍याशी संपर्क होतो. त्यामुळे माहिती देण्यासाठी किंवा कागदपत्र सादर करण्यासाठी मतदारांना सोईचे झाले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp