प्रेमविवाहचा अंत: सांगलीत प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीच्या छातीवर बसून आवळला गळा, झोपेत मृत्यू झाल्याचा केला बनाव – Maharashtra News

प्रेमविवाहचा अंत:  सांगलीत प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीच्या छातीवर बसून आवळला गळा, झोपेत मृत्यू झाल्याचा केला बनाव – Maharashtra News



पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्येची घटना ताजी असतानाच सांगलीच्या विश्रामबाग भागात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दारू पिऊन सतत मारहाण करणाऱ्या पतीचा, पत्नीने तिच्या २३ वर्षीय प्रियकराच्या मदतीने छातीवर बसून गळा दाबून खून केला. प्रेमविवाह आणि दोन मुले असतानाही पत्नीने हे कृत्य केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आनंद हणमंत सर्जे (२८, रा. पोळमळा, सांगली) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. आनंद बेशुद्धावस्थेत होता. पत्नी आणि मेहुण्याने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी तदेहाची बारकाईने पाहणी केली असता आनंदच्या गळ्यावर नखांचे ओरखडे स्पष्ट दिसत होते. प्रियकराला घरी बोलावले पती दारू पिऊन मारहाण करतो व शिवीगाळ करतो, या रागातून पत्नीने रात्री किरकोळ वादानंतर आपल्या प्रियकराला घरी बोलावले. आनंदला प्रतिकार करता येऊ नये म्हणून प्रथम त्याचे पाय ओढणीने घट्ट बांधण्यात आले. त्यानंतर दोघांनी त्याच्या छातीवर बसून निर्घृणपणे त्याचा गळा घोटला आणि खून पचवण्यासाठी तो झोपेत गेल्याचा बनाव रचला. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या २३ वर्षीय प्रियकराला अटक केली. पोलिसांची केली दिशाभूल
सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पत्नीने एक बनाव रचला. “त्यांना कुणीतरी मारहाण केली होती आणि त्यानंतर घरी झोपलेले असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असे तिने पोलिसांना सांगितले. मात्र, तिच्या बोलण्यात वारंवार विसंगती आढळत होती. मृतदेह मिरजेतील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर आनंदचा मृत्यू गळा दाबल्यानेच झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp