गुजराती एज्युकेशन सोसायटी निवडणूक: प्रोग्रेसिव्ह पॅनल विजयी: निलेश लाठिया अध्यक्ष, डॉ. नितीन सेठ उपाध्यक्षपदी निवड – Amravati News

गुजराती एज्युकेशन सोसायटी निवडणूक: प्रोग्रेसिव्ह पॅनल विजयी:  निलेश लाठिया अध्यक्ष, डॉ. नितीन सेठ उपाध्यक्षपदी निवड – Amravati News



अमरावती: विदर्भातील नामांकित ‘गुजराती एज्युकेशन सोसायटी’च्या संचालक मंडळाची निवडणूक रविवारी पार पडली. या चुरशीच्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह पॅनलने ८ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. संस्थेच्या अध्यक्षपदी प्रोग्रेसिव्ह पॅनलचे सीए निलेश लाठिया विजयी झाले, तर उपाध्यक्षपदाची जबाबदारी समर्पण पॅनलचे डॉ. नितीन सेठ यांच्याकडे आली. समर्पण पॅनलला ६ जागांवर समाधान मानावे लागले. रविवारी दुपारी ३.३० पर्यंत मतदान आटोपल्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता मतमोजणी सुरू झाली, जी उशिरा रात्रीपर्यंत चालली. एकूण ३९० मतदारांपैकी ३२७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीदरम्यान २७ मते अवैध ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी हितेंद्र धाबलिया यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली. अध्यक्षपदासाठी विजयी झालेले सीए निलेश लाठिया यांना १७१ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि माजी अध्यक्ष दिलीप पोपट यांना १४३ मतांवर थांबावे लागले. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह कार्यकारिणीच्या इतर १२ संचालकांसाठीही रविवारीच मतदान झाले. यामध्ये प्रोग्रेसिव्ह पॅनलचे भरत भायानी, ॲड. निलेश शाह, योगेंद्र देसाई, तुषार श्रॉफ, जितेंद्र दोशी, चेतन लाठिया आणि मुकेश गगलानी हे सात उमेदवार विजयी झाले. समर्पण पॅनलमधून दिनेश सेठिया, किशोर कारिया, सीमेश श्रॉफ, अमृत पटेल आणि सीए राजेश पटेल यांचा समावेश आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी हितेंद्र धाबलिया यांना रमेश कामदार, राजेंद्र पारेख, राजेंद्र मालवीया, तुषार पटेल, जितेंद्र आनंदपरा आणि हरीश संतोषिया यांनी सहकार्य केले. संचालकपदाच्या १२ व्या जागेसाठी प्रोग्रेसिव्ह पॅनलचे मुकेश गगलानी अवघ्या ३ मतांनी विजयी झाले होते. या निकालावर पराभूत उमेदवार हर्षद उपाध्याय यांनी आक्षेप घेत पुनर्मतमोजणीची मागणी केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य करत पुन्हा मतमोजणी केली, मात्र त्यात कोणतीही चूक आढळली नाही. त्यानंतर मुकेश गगलानी यांचा विजय घोषित करण्यात आला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp