देह व्यापारातून मराठी अभिनेत्रीची सुटका: गिरगावातील हॉटेलवर पोलिसांचा मोठा छापा; दलाल सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट जेरबंद – Mumbai News

देह व्यापारातून मराठी अभिनेत्रीची सुटका:  गिरगावातील हॉटेलवर पोलिसांचा मोठा छापा; दलाल सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट जेरबंद – Mumbai News



मुंबईतील गिरगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींसह आणखी एका अभिनेत्रीची सुटका करण्यात आली असून, सेलिब्रिटींसोबत काम करणारा मेकअप आर्टिस्ट दलाल म्हणून रंगेहाथ पकडण्यात आला आहे. या कारवाईमुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरगावातील एका हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. पोलिसांनी प्रथम बनावट ग्राहक पाठवून व्यवहाराची खात्री केली. त्यानंतर छापा टाकत संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. दोन अभिनेत्रींची सुटका, ओळख गुप्त छाप्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली. यापैकी एक अभिनेत्री मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारत आलेली असून ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरी अभिनेत्री बंगाली आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये कॅमिओ भूमिका करणारी आहे. दोघींची ओळख पोलिसांनी जाणीवपूर्वक गुप्त ठेवली असून, त्यांचे संरक्षण आणि तपासाच्या दृष्टीने कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्टच निघाला दलाल या कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेला दलाल हा चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींसोबत काम करणारा मेकअप आर्टिस्ट असल्याची माहिती समोर आली आहे. तो अभिनेत्री आणि ग्राहक यांच्यात मध्यस्थी करत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. मोठ्या रकमा उकळल्या जात असल्याचा संशय पोलिसांच्या प्राथमिक तपासात महिलांना देहव्यापारासाठी भाग पाडले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ग्राहकांकडून मोठी रक्कम आकारून त्यातून आर्थिक व्यवहार केले जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. छाप्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. मोठ्या मानवी तस्करी रॅकेटचा तपास सुरू या प्रकरणामागे केवळ स्थानिक टोळी नसून मोठे मानवी तस्करीचे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास मुंबई पोलीस करत आहेत. आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्ड, डिजिटल चॅट्स आणि संबंधित व्यक्तींच्या संपर्कांची चौकशी सुरू असून या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे. तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. यापूर्वी तुर्भेतही अशीच कारवाई याच वर्षी जानेवारी महिन्यात नवी मुंबईतील तुर्भे नाका परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या रॅकेटवर मानवी तस्करी विरोधी पथकाने कारवाई केली होती. त्या वेळी सात महिलांची सुटका करण्यात आली होती, तर तीन जणांना अटक करण्यात आली होती. तपासात आरोपी महिलांना लॉजमध्ये ठेवून ग्राहकांच्या पसंतीनुसार व्यवहार ठरवत असल्याचे समोर आले होते. मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले की, शहरातील मानवी तस्करी आणि देहव्यापाराच्या साखळ्यांविरोधातील विशेष मोहीम सुरू असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp