
खात्याला मूर्ख मंत्री भेटलाय, चोर साला, अशा शब्दात अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी राज्याच्या मंत्री महोदयांबद्दल अपशब्द वापरले असल्याचे एका व्हिडिओमधून समोर आले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शरद सोनवणे यांनी यावर खुलासा देखील केला आहे. मी असे बोलल
.
व्हिडिओमध्ये आमदार शरद सोनवणे म्हणतात, कसला मंत्री भेटलाय आपल्याला. आता मी मुख्यमंत्र्यांसमोर त्यांना उभे करणार आहे. सोबतच घोडेगाव प्रकल्प विकास अधिकारी प्रदीप देसाईंची सुद्धा झाडाझडती करणार आहे. आदिवासी खात्याचे मंत्री व अधिकाऱ्यांविषयी बोलताना शरद सोनवणे यांनी या भाषेचा वापर केला. व्हिडिओ समोर आल्यावर शरद सोनवणे यांनी यावर कबुली देखील दिली आहे.
शरद सोनवणे म्हणाले, मी असे बोललोय पण ते मी मंत्र्यांना उद्देशून नव्हे तर घोडेगाव प्रकल्प विकास अधिकारी देसाईबद्दल बोलल्याचा खुलासा सोनवणेंनी एका वृत्तवाहिनीशी फोनवर बोलताना केला. आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आज जुन्नरमध्ये बैठक होती. या बैठकीत आदिवासी समाजाच्या विकासासाठी असलेल्या घोडेगाव प्रकल्पाचे अधिकारी देसाईंची मी झाडाझडती घेतली. ते समाजाच्या हिताचे काम करत नाहीत, त्यांच्याविरोधात माझ्या खूप तक्रारी आलेल्या आहेत. या देसाईंना गोरगरिबांचे काही पडलेले नाही, असे असताना देसाई मंत्र्यांच्या मात्र पुढे-पुढे करतो. त्यामुळे, मी देसाईंवर संतापलो. त्याच देसाईंना मी संबंधित खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसमोर उभे करुन, झाडाझडती घेणार.
पुढे बोलताना शरद सोनवणे म्हणाले, आपल्याकडे असलेल्या व्हिडीओमधील संताप हा मंत्र्यांबद्दल नव्हे तर अधिकाऱ्याला उद्देशून असल्याचे सोनवणेंचे म्हणणे आहे. पण, हा संवाद ऐकल्यावर प्रथमदर्शनी तर ते मंत्र्यांना उद्देशून बोलल्याचे जाणवत आहे. त्यामुळे, एक सत्ताधारी आमदार आपल्याच महायुती सरकारमधील मंत्र्याला उद्देशून असे शब्द वापरत असतील, तर सर्व सामान्यांची काय अवस्था असेल, असा सवाल उपस्थित होत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.