‘गोल्डन ट्रँगल’: म्यानमारमध्ये सायबर ठगांच्या अड्ड्यांवर विविध देशांचे 5300 नागरिक अडकले, ओलीस ठेवलेल्यांमध्ये 800 भारतीय, यापैकी महाराष्ट्रातील 25 तरुण

‘गोल्डन ट्रँगल’:  म्यानमारमध्ये सायबर ठगांच्या अड्ड्यांवर विविध देशांचे 5300 नागरिक अडकले, ओलीस ठेवलेल्यांमध्ये 800 भारतीय, यापैकी महाराष्ट्रातील 25 तरुण

  • Marathi News
  • International
  • 5300 Citizens Of Various Countries Trapped In Cyber Thugs’ Hideouts In Myanmar, 800 Indians Among Those Held Hostage, 25 Youth From Maharashtra

नवी दिल्ली16 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

बँकॉकमध्ये ७० हजार पगाराच्या ऑनलाइन जाहिरातींचे शिकार ठरलेल्या विविध देशांतील ५३०० तरुणांना थायलंड आणि म्यानमार सीमेवरील कुप्रसिद्ध ‘गोल्डन ट्रँगल’ भागात डांबून ठेवले आहे. यात ८०० ते १ हजार भारतीय तरुण असून महाराष्ट्रातील किमान २५ जणांमध्ये नाशिकातील ८ आणि बीड, जळगाव, साताऱ्यातील काही तरुणांचा समावेश आहे.

‘सिव्हिल सोसायटी नेटवर्क फॉर ह्युमन ट्रॅफिकिंग व्हिक्टिम असिस्टन्स’ या संस्थेनुसार, ५३०० ओलिसांमध्ये १,६०० चिनी नागरिक आहेत. २०० म्यानमारचे, २० थायलंडचे तर फिलिपाइन्स, तैवान, मलेशिया, ब्राझील, रशिया, केनिया, युगांडा, रवांडा व झिम्बाब्वेच्या नागरिकांचा समावेश आहे.

मंत्री महाजन, खा. चव्हाण, धनंजय मुंडेंचा पुढाकार

तरुणांच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावत मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवर संवाद साधत पीडित तरुणांना धीर दिला. खासदार अशोक चव्हाण यांनीही पत्र पाठवून राज्य व केंद्राकडे पाठपुरावा केला. तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे तरुणांच्या सुटकेसाठी राज्य, केंद्र सरकारने परराष्ट्र मंत्रालय व बँकॉकमधील भारतीय दूतावासाशी समन्वय साधून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. मुख्यमंत्र्यांचेही या घटनेकडे बारीक लक्ष आहे.

तीन देशांच्या सीमेवर बांधलेल्या उच्च सुरक्षेतील परिसरात सायबर अड्डे

थायलंड, लाओस व म्यानमार या देशांच्या सीमा जिथे मिळतात, त्या भागाला ‘गोल्डन ट्रँगल’ म्हटले जाते. हा पूर्वी अमली पदार्थांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध होता. उच्च सुरक्षेखाली असलेल्या या परिसरात सायबर गुन्हेगारी, मानवी तस्करीचे अड्डे आहेत. आशियातील तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून येथे आणले जाते. त्यांचे पासपोर्ट जप्त करून जगभरातील लोकांची सायबर फसवणूक करण्यासाठी त्यांना डांबले जाते. कामास नकार दिल्यास बंदुकीचा धाक, विजेचा शॉक देत मारहाणही केली जाते. ओलीस ठेवलेल्या नाशिकच्या कौस्तुभ शेजवळ या तरुणाने एक व्हिडिओ जारी करत आपल्यावरील अत्याचाराची वाच्यता केली. त्याने सुटकेसाठी मदतही मागितली आहे.

कारवाई : दीड-दोन वर्षात २४०० भारतीयांची सुटका

भारत सरकार, परराष्ट्र मंत्रालय, राष्ट्रीय तपास संस्था आदींच्या प्रयत्नांमुळे गेल्या दीड-दोन वर्षांत म्यानमार, कंबोडिया आणि लाओसच्या सायबर स्कॅम केंद्रांमधून २४०० हून अधिक भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे की, म्यानमारच्या या स्कॅम सेंटर्समध्ये १ लाखाहून अधिक लोकांना इच्छेविरुद्ध तिथे काम करण्यास भाग पडले आहेत. संयुक्त राष्ट्रे आणि परदेशी दबावानंतर म्यानमार प्रशासनाने अब्जावधी डॉलर्सच्या या अवैध गुन्हेगारी ‘उद्योगा’ वर कारवाई केली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp