
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे या देखील केले जम्मू-काश्मीरला गेलेल्या आहेत. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्यांनी आम्ही सर्वजण सुखरुप असल्याचे त्यांनी सांगितला आहे. तसेच अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्र येण्यासाठी ता
.
या संदर्भात रूपाली ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून आपण जम्मू-काश्मीरमध्ये असल्याचे सांगितले आहे. ही घटना घडली त्या ठिकाणी देखील आम्ही जाऊन आलो आहोत. त्यामुळे आम्ही सर्वजण खूप घाबरलेलो असल्याचे रूपाली ठोंबरे यांनी सांगितले. आमच्या सोबत नाशिक मधील देखील काही पर्यटक आहोत. मात्र, आम्ही सर्व सुरक्षित असलो तरी आम्हाला इथून निघण्यासाठी विमानाची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या ठिकाणची परिस्थिती आणि ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या परिस्थितीचा आम्ही विचारही करू शकत नाही. येथे हल्ला झाला असला तरी या ठिकाणी काम करणाऱ्या स्टाफ मध्ये अनेक मुस्लिम बांधव आहेतच. या दरम्यान आम्हाला आदील नावाच्या एका व्यक्तीने मोठी मदत केली आहे. ते आजही आम्हाला भेटण्यासाठी आले असल्याचे रूपाली ठोंबरे यांनी सांगितले. मात्र, सरकारने जी कारवाई करायची त्यांनी करावी. मात्र आधी पर्यटकांना त्यांच्या घरी तातडीने पोहोचवावे. येथील परिस्थितीत बिकट आहे, असे देखील रूपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.
पर्यटकांना लवकरात लवकर बाहेर काढणे गरजेचे
आमच्या सोबत अनेक लहान मुले आहोत. आम्ही सर्वजण सेफ नाहीत. माझे या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलत झाले आहे. मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलून त्यांनी विमानाची सोय करून द्यावी, अशी विनंती त्यांना केली आहे. तसेच ही सर्व मदत तातडीने करून पर्यटकांना लवकरात लवकर बाहेर काढणे गरजेचे असल्याचे ठोंबरे यांनी म्हटले आहे.
इथे सर्वत्र प्रचंड दहशत
या संदर्भात रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, माझ्या सर्व कुटुंबासह श्रीनगर जम्मू-काश्मीरला फिरायला आलो होतो. आजचा हल्ला झाला त्यानंतर आम्ही प्रचंड घाबरलेलो आहोत. काही पर्यटक आजच आलेले आहेत. तर काही जणांच्या परवा आणि त्यानंतरच्या फ्लाईटचे तिकीट आहे. माझे महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती आहे. इथे पर्यटक अडकून पडले आहेत. त्यांना तात्काळ महाराष्ट्रात येण्याची व्यवस्था करण्यात यावी. इथे सर्वत्र प्रचंड दहशत पसरलेली आहे. सर्व पर्यटक आपल्याला लहान मुलांसोबत फिरायला आलेले असल्याचे देखील रूपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.