
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विरोध दर्शवण्यात आला होता. देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवत देवस्थानला पत्र लिहून चुकीचा
.
महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार येथे शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार आहेत. पण आता या कार्यक्रमाला देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे. यावर बोलताना हा कार्यक्रम संपूर्णतः: शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीतावर आधारित असलेल्या नृत्याचा कार्यक्रम असल्याचे प्राजक्ता माळीने स्पष्ट केले.
काय म्हणाली प्राजक्ता माळी? यंदाच्या महाशिवरात्रीला काय करावे असा विचार मनात घोळत असतानाच मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला. त्यांनी सांगितले की, ’दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीतावर, नृत्यावर आधारित उत्सव आयोजित करत असतो. आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार इथे येऊन आपली कला सादर करुन गेले आहेत. फुलवंतीच्या निमित्ताने आम्हाला कळले की तुम्ही सुद्धा भरतनाट्यम नर्तिका आहात. तर यंदाच्या वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम सादर कराल का?’ अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्यदेवता आहे, आराध्य दैवत आहे. त्यामुळे मी वेळ न दवडता त्यांना तात्काळ होकार कळवला. ” असं सांगत प्राजक्ताने या कार्यक्रमासाठी तिला का आमंत्रित केले होते याबाबत स्पष्ट केले.
मनातील किंतू परंतू काढून टाका
प्राजक्ता म्हणाली की, मी इथे आवर्जून नमूद करु इच्छिते की महाशिवरात्रीनिमित्त होणारा हा कार्यक्रम संपूर्णत: शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीतावर आधारित असलेल्या नृत्याचा कार्यक्रम आहे. ज्यांना माहित नसेल त्यांना मी सांगू इच्छिते की मी स्वत: भरतनाट्यम नर्तिका आहे. मी विशारद, अलंकार केलेले आहे. त्यातच बीए, एमए केले आहे. तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातील किंतू परंतू काढून टाकावे. समाजाची दिशाभूल करु नये, अशी मी त्यांना विनंती करते, असे म्हणत प्राजक्ताने ललिता शिंदे यांच्या प्रश्नांना त्यांचे नाव न घेता उत्तर दिले.
देवाच्या दारात कुणी सेलिब्रिटी नसतो एक गोष्ट आवर्जून सांगायची की देवाच्या दारात कोणी सेलिब्रिटी नसतो. सगळे भक्त असतात. त्याच भक्तीभावाने मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजाच्या चरणी रुजू करणार आहे. अर्पण करणार असल्याचे प्राजक्ताने सांगितले. म्हणूनच कार्यक्रमाचे नाव शिवार्पणमस्तु असे आहे. वेळेच्या कारणामुळे मी दोनच रचना सादर करणार आहे. बाकी रचना माझे सहकलाकार सादर करतील. मी निवेदन करणार आहे, असेही ती म्हणाली. चेंगराचेंगरी, गर्दीची भीती असेल तर विश्वस्त, पोलिस जो निर्णय घेतील तो सामाजिक भान बाळगत सर्वांवर बंधनकारक असणार आहे. तो सगळ्यांनाच मान्य असणार आहे, असे तिने स्पष्ट केले.
प्राजक्ताचा नृत्य कार्यक्रम होणार – त्र्यंबकेश्वर विश्वस्त दरम्यान प्राजक्ताच्या या व्हिडीओनतंर आता त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त मनोज थेट यांच्याकडूनही या वादावर आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच प्राजक्ता माळीचा त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रम होणार असून ती भरतनाट्यम आणि कथ्थक करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरवर्षी प्रमाणे अशा कार्यक्रमाचे यंदाही आयोजन करण्यात आले आहे. पुरातत्व विभागाकडूनच तशी परवानगी मिळाल्याचे मनोज थेट यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.