
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता महिला आयोग चांगलाच कामाला लागला असून नाशिक मध्ये महिला आयोगाच्या माध्यमातून जन सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पत्रकारांनी विचारल
.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन मंडळाच्या सभागृहात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून जन सुनावणी पार पडली. यात तक्रारदार आणि पीडित महिला स्थानिक पातळीवर तक्रार देखील तात्काळ दाखल करू शकतात. यासाठी महिलांना कोणतीही पूर्वसूचना देण्याची आवश्यकता नाही. त्या थेट जनसुनावणीस उपस्थित राहून, समस्या लेखी स्वरूपात आयोगापुढे मांडू शकतात.
यावेळी रूपाली चाकणकर यांनी महिलांच्या बाजूने कायदे आहेत. कडक कायदे आहेत. मात्र, त्याला पळवाटा काढल्या जात असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ग्रामीण भागात आजही जन्म दाखल्यामध्ये बदल करून बालविवाह लावले जात आहेत. हुंडाबळीच्या विरोधात कायदे असूनही ते मोडले जात असल्याची खंत व्यक्त केली. मात्र महिलांनी अत्याचार विरोधात आवाज उठवायला हवा, आपल्याला तो अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणातही बार कौन्सिलला पत्र
वैष्णवी हगवणे केसमधील आरोपींच्या वकिलांचे वर्तन ॲडव्होकेट्स कायदा,१९६१ मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये वकिलांनी माध्यमात बोलताना भान बाळगणे गरजेचे आहे. राज्य महिला आयोगाने सचिव, बार कौन्सिल यांना पत्र लिहून याबाबत गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी केली आहे.
महिला आयोगावर लोकांचा विश्वास
महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून जन सुनावणी घेत न्याय निवाडा केला जात आहे. तुम्ही तक्रारीचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी महिला आयोगाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक प्रकरणात लोक महिला आयोगाचे नाव घेतात. हा महिला आयोगावरील त्यांचा विश्वास असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
भाजप आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबातील वाद सध्या नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या वादात विविध आरोप-प्रत्यारोप झाले असून, पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यात महिला आयोगाकडे कोणतीच तक्रार आली नसल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे.
प्रिया फुके यांचे आरोप काय?
प्रिया फुके, या आमदार परिणय फुके यांच्या दिवंगत लहान भावाच्या पत्नी आहेत. त्यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यात त्यांनी फुके कुटुंबीयांवर मानसिक छळ, संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न आणि धमक्यांचे आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पती संकेत फुके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर आर्थिक आणि मानसिक दबाव टाकण्यात आला. त्यांनी असा आरोपही केला की, सासरच्या मंडळींनी त्यांच्या पतीच्या व्यवसायातील हिस्सेदारी परस्पर आपल्या नावावर करून घेतली.
सासू रमा फुके यांची तक्रार
या वादात दुसरी बाजू म्हणजे, परिणय फुके यांच्या आई डॉ. रमा फुके यांनीही अंबाझरी पोलिस ठाण्यात प्रिया फुके यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, प्रिया फुके यांनी नातवंडांना भेटण्यासाठी पैसे मागितले आणि सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रिया फुके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस तपास आणि राजकीय प्रतिक्रिया
या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या तक्रारींची नोंद घेतली असून, तपास सुरू आहे. तथापि, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचा आरोप आहे की, राजकीय दबावामुळे तपास संथगतीने सुरू आहे.
परिणय फुके यांची भूमिका
आमदार परिणय फुके यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा वाद कौटुंबिक असून, माझा थेट संबंध नाही. मी दोन्ही बाजूंना समजून घेण्याचा आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण तडजोड यशस्वी झाली नाही.” परिणय फुके यांच्या कुटुंबातील हा वाद सध्या न्यायप्रविष्ट असून, पोलिस तपास सुरू आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. पुढील तपासात सत्यता स्पष्ट होईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.