
नागपूरमधील एका बारमध्ये बसून सरकारी फायलींवर सह्या करताना आढळलेल्या अधिकाऱ्याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के याच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आ
.
संबंधित अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हा अधिकारी इतर दोघांसोबत नागपूरमधील कीर्ती बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये मद्यपान करत असताना महाराष्ट्र शासनाच्या फायल्स तपासत असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. आता संबंधित व्हिडीओबाबतचे सीसीटीव्ही फुटेजही प्राप्त झाले आहे. या फाईल्स सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असल्याची खातरजमा झाली असून, त्या फाईल्स त्यांनी चामोर्शी (जि. गडचिरोली) येथून नागपूरमध्ये नेल्या होत्या.
या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारने तातडीने चौकशीचे आदेश दिले होते. महसूल मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याच्या हकीकत समोर आली. दरम्यान, याप्रकरणी बारमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, चौकशीदरम्यान, तो अधिकारी चामोर्शी येथे कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शासनाकडून निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले असून, गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली.
सरकारी कागदपत्रांची अवहेलना
शासकीय कागदपत्र हे अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील असतात. अशा कागदपत्रांवर सार्वजनिक ठिकाणी तेही मद्यपान करताना सह्या करणे ही गंभीर शिस्तभंगाची बाब मानली जाते. त्यामुळे या प्रकरणात केवळ निलंबन न करता, सखोल चौकशी करून पुढील शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, शासन स्तरावरून याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. पुढील तपशील चौकशीनंतर उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा…
दारूचे घोट घेत शासकीय फायलींवर सह्या:नागपूर येथील बिअर बारमधील घटना; सर्वसामान्यांत उसळली संतापाची लाट, पाहा VIDEO
नागपूर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील मनीषनगर परिसरातील एका प्रसिद्ध बिअर बारमध्ये चक्क शासकीय फायलींचा गठ्ठा घेऊन तिघेजण दारू पिण्यासाठी बसले असल्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा प्रकार रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडल्याची माहिती असून, संबंधित तिघे जण दारूचे घोट रिचवत फायलींची तपासणी करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.