
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी नाशिकमध्ये बोलताना पक्षवाढीसाठी आपल्या पक्षाची कवाडे सर्वांसाठी खुली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजरांसाठी भाजपने अ
.
ठाकरे गटाने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत बुधवारी सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याचे संकेत दिलेत. तत्पूर्वी स्वतः बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपण भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट केले होते. पण बडगुजर यांना पक्षात घेण्यास भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. पण आता बावनकुळे यांनी स्वतःच बडगुजर यांना पक्षात घेण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाविषयी गिरीश महाजन लक्ष घालत आहेत. पक्षवाढीसाठी आमची कवाडे सर्वांसाठी खुली आहेत, असे बावनकुळे यांनी याविषयी बोलताना स्पष्ट केले.
15 ऑगस्टच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी नेत्यांच्या मागे-पुढे फिरणाऱ्यांना तिकीट मिळणार नसल्याचेही ठणकावून सांगितले. नेत्यांच्या मागे-पुढे करणाऱ्या महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही. त्यामुळे कुणीही नेत्यांपुढे चमकोगिरी करू नये. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मागील 11 वर्षांत मोदी सरकारने केलेल्या कामांची उजळणी करून ती जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत. आगामी निवडणुकांत आपल्याला एकेक मत महत्वाचे आहे. त्यामुळे कमळ चिन्हावर लढणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला आपल्याला हरू द्यायचे नाही. सर्वांनी असा संकल्प घेतला पाहिजे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण, शेतकरी वीज बिल माफीसारखे निर्णय घेतले होते. आता 15 ऑगस्टला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लागेल. त्यामु्ळे आपल्याला अधिक प्रयत्न करावे लागतील, असे ते म्हणाले.
बडगुजरांच्या प्रवेशाला सीमा हिरेंचा विरोध
दुसरीकडे, सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी कडाडून विरोध केला आहे. सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पण यासंबंधी आमच्याशी कोणतीही चर्चा किंवा विचारणा झाली नाही. मी स्वतः बडगुजर यांच्या विरोधात दोनदा निवडणूक लढवली. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला. आमच्या वरिष्ठ नेत्यांवर आक्षेपार्ह टीका केली.
खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी त्यांनी चुकीची माहिती पसरवली होती. एवढेच नाही तर नारायण राणे यांच्यावर त्यांनी अटक होईल अशी परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे अशा व्यक्तीस पक्षात प्रवेश देऊ नये अशी आमची भूमिका आहे. बडगुजर यांच्यावर सध्या 17 गुन्हे दाखल आहेत. त्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशीही संबंध असल्याची माहिती आहे. त्यांच्या मुलावरही गोळीबाराचा गुन्हा दाखल आहे. या सर्व प्रकरणांमधून स्वतःची सुटका करण्यासाठी ते भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत असावेत, असे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा…
राज्यातील 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द:फडणवीस सरकारचा धाडसी निर्णय; योजनांची अंमलबजावणी 3 वर्षांपासून रखडली होती
मुंबई – राज्याच्या तिजोरीवर माझी लाडकी बहीण योजनेचा ताण पडत असल्याच्या बातम्या चर्चेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यभरातील 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. या योजनांची मागील 3 वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे अंमलबजावणी होत नव्हती. परिणामी, सरकारने या योजनाच गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.