
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहर यांच्या वतीने शनिपार चौक, बाजीराव रस्ता येथे ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे १५०० हून अधिक आबालवृद्धांनी भव्य फलकावर मराठी स्वा
.
उपक्रमाला राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, गणेश सातपुते, किशोर शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रवक्ते योगेश खैरे, संघटक प्रल्हाद गवळी, मनविसेचे प्रशांत कनोजिया, आशिष साबळे, अभिषेक थिटे, धनंजय दळवी यांनी भेट दिली.
मनसे शहर सचिव वसंत खुटवड, मनविसे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ यांनी उपक्रमाचे आयोजन केले. तर, रुपेश चांदेकर, ऋषिकेश करंदीकर, करण मेहता, चंद्रकांत राजगुरु, प्रमोद उमरदंड, राहूल मुंगले यांनी उपक्रमाला सहकार्य केले. मराठीत स्वाक्षरी करणाऱ्याला यावेळी पेढा देखील देण्यात आला. या उपक्रमाचे यंदाचे १६ वे वर्ष होते. यावेळी कॅलिग्राफी करणारे कलाकार देखील सहभागी झाले होते. मराठी भाषेचे महत्व आणि महती या उपक्रमाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आली.
संगीतमय शोभायात्रा आणि लोककलांमधून मराठीचा जागर
मराठमोळ्या पोशाखातील सालंकृत पुणेकरांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर लोककलांचे सादरीकरण करीत संगीतमय शोभायात्रेव्दारे मराठीचा जागर केला.निमित्त होते संगीत क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या संगीतानंद संस्थेतर्फे आज आयोजित मराठी भाषा गौरव दिन या संगीतमय कार्यक्रमाचे. यानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध लेखिका विनिता पिंपळखरे आणि प्रसिद्ध गायिका ज्योती गोराणे, तसेच संगीतानंदच्या संचालक ज्योती देशमुख, द.मा. मिरासदार यांच्या कन्या सुनेत्रा मंकणी, हेमा बेलड यांच्यासह संगीतानंदचे सदस्य आणि मराठीप्रेमी रसिकजन सहभागी झाले होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या गणेश वंदना, नांदी, ओव्या, वासुदेवाची गाणी, अभंग, बालगीते, भोंडला, मंगळागौर आणि नाट्य प्रवेश अशा वैविध्यपूर्ण लोककलांनी रसिकांची मने जिंकली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.