
मृत्यूनंतर मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी जिल्ह्यातील ७०० ग्रामपंचायतींना अद्याप स्मशानभूमीच शासनाकडून बांधून देण्यात आलेली नाही. परिणामी स्वतःच्या किंवा इतरांच्या शेतात अथवा नदी, नाल्याकाठी, उघड्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्याम
.
गाव तेथे स्मशानभूमी असे शासनाचेच धोरण आहे. मृत्यूनंतर त्या मानवी शरीरावर अत्यंविधीचे सोपस्कार व्यवस्थित करता यावेत, याकरिता बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमी उभारण्यासाठी लाखो रुपये मंजूर करून सुसज्ज स्मशानभूमी निर्माण करण्यात आल्या आहेत. येथे शेडसह पाणी व रस्त्यांचे काँक्रिटीकरण देखील करण्यात आले आहे. परंतु, जिल्ह्यात आजही अशी गावे आहेत जेथे स्मशानभूमीच नाही. त्यामुळे त्यांना नजीकच्या गावांमध्ये जाऊन अत्यंविधी करावा लागतो. काही गावांमध्ये जागा असली तरी सुविधा नाही, शेड देखील नाही. साधे टिनशेड देखील उभारले नाही ^बऱ्याच गावांमध्ये अद्याप सुसज्ज स्मशानभूमी तर सोडाच; पण मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधे टिनशेड देखील उभारले गेलेले नाही. परिणामी, मृतदेहांवर अंतिम संस्कार करणे कठीण झाले आहे. आमच्या गावात ग्रामस्थांना उघड्यावरच नाल्याकाठी अंत्यसंस्कार उरकावे लागत आहेत. -सुनील राठोड, जुनी शिदवाडी कौंडण्यपूर येथील स्मशानभूमीची जागा मोठमोठ्या वृक्षांमुळे दबली आहे, तर दुसरे छायाचित्र पर्यटन स्थळाचा वापर अंत्यसंस्कार करण्यासाठी होत आहे.
३३१ गावात जमिनीची समस्या; कुणी दान करेना जिल्ह्यातील ३३१ गावांमध्ये जमीन उपलब्ध नसल्याने तेथे स्मशान भूमीच नाही. पूर्वी काही दानशूर व्यक्तींनी स्मशानभूमीसाठी मोठ्या प्रमाणात जमिनी दान दिल्या आहेत. तसे पत्रही ग्रा.पं.ला दिले आहे. आता मात्र तसे होताना दिसत नाही. गावांची लोकसंख्या वाढत आहे. यामुळे गावात स्मशानभूमी गरजेची असताना आता या सामाजिक कार्यासाठी कोणी जमीन देण्यासाठी तयार होत नाही.
माहिती घेऊन उपाययोजना करू ^स्मशानभूमी संदर्भात पंचायत विभाग काम पाहतो. त्यामुळे जिल्ह्यातील स्मशानभूमीची माहिती घेण्यात येईल. स्मशानभूमी दुरुस्ती, बांधकामासाठी डीपीसीतून निधी मिळतो. तशी निधीसाठी मागणीही करण्यात येईल. या महत्त्वाच्या समस्येवर तत्काळ उपाययोजना केल्या जातील. -बाळासाहेब बायस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
जागेसाठी प्रस्ताव, कारवाई होईना जिल्ह्यात ८४१ ग्रा. पं.अंतर्गत १६१८ गावे आहेत. त्यापैकी ९१८ गावांमध्ये सुविधांसह स्मशानभूमी आहे. परंतु ७०० गावांमध्ये जागा असून शेड नाही. तर २८५ गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार कोठे करावा, असा प्रश्न मृतकांच्या कुटुंबीयांना पडतो. यातील कित्येक गावांमध्ये जागांकरिता महसूल विभागांकडे प्रस्ताव गेले आहेत. परंतु, यावर अद्याप कारवाई झाली नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.