
मराठी बोललो नाही म्हणून बस थांबवत कंडक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना बेळगावमध्ये घडली आहे. जवळपास 20 पेक्षा जास्त लोकांनी मारहाण केल्याचा आरोप कंडक्टरने केला आहे. बेळगाव खुर्द येथे ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
.
मला मराठी येत नाही, कन्नडमधूनच बोलणार असे कंडक्टरने सांगितल्याने मारहाण करण्यात आली आहे. बेळगाव येथील मध्यवर्ती बस स्थानाकावरून एक तरुण व तरुणी बसमध्ये बसले व बाळेकुंद्री खुर्दसाठी निघाले. यावेळी कंडक्टरने तिकीटसाठी विचारले तेव्हा तरुणीने दोन तिकीट देण्यास सांगितले तेव्हा दुसरे कोणाला असे विचारल्यावर तरुणीने तरुणाकडे बोट दाखवले. तेव्हा कन्नडमधून बोलणाऱ्या कंडक्टरला मराठीमधून बोलण्यास तरुणाने सांगितले. तेव्हा मला मराठी येत नाही मी कन्नडमधूनच बोलणार असे कंडक्टरने उत्तर दिले. त्यानंतर तुला आमचे गाव येऊ दे मग सांगतो असे उत्तर तरुणाने दिले.
बस बाळेकुंद्री खुर्द येथे येताच 50 हून अधिक लोकांनी बस रस्त्यात अडवली. नंतर बसमध्ये 20 हून अधिक जणांनी चढून कंडक्टरला मारहाण केली. यावेळी मध्यस्थी करण्यास आलेल्या बस ड्रायव्हरला देखील शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर कंडक्टरने जिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेतले आहेत. तसेच माळमारुती पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी भाषेवरून वाद होण्याच्या अनेक घटना घडत आहेत. मुंबई व उपनगर भागात मराठी माणसांवर परप्रांतीयांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना गेल्या महिन्यात घडल्या होत्या. आता दक्षिणेकडे मराठी बोलता आले नाही म्हणून मराठी माणसांनी कन्नड भाषिक कंडक्टरला मारल्याची घटना घडली आहे. एवढ्या वर्षांनी देखील भाषावाद सुरूच असून यावर तोडगा निघणे महत्त्वाचे आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.