
मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी माझ्यावर थेट आरोप केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना ‘समज’ द्यावी, असे पंकजा मुंडे यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत
.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदार सुरेश धस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट गुपचूप का घेतली याचे उत्तर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिले पाहिजे.
तेव्हाच गुन्हेगारी वाढल्याचे दिसले का?
पंकजा मुंडे म्हणाल्या की, गेली 3 वर्षे धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते. भाजप सत्तेत होती, तेव्हा सुरेश धस आमदार होते. तेव्हाही वाल्मीक कराड काम करत होते पण सुरेश धस यांनी तेव्हा त्यांची तक्रार केली नाही मी मंत्री झाले आणि तेव्हाच धस यांनी त्यांची तक्रार केली. मी मंत्री झाल्यावरच त्यांनी बीडमधील वाढती गुन्हेगारी दिसली असेही त्यांनी म्हटले आहे.
धसांनी बीडचे प्रकरण का पेटवले?
पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीडमधील प्रकरणाशी माझा काही संबंध नसताना आणि मुचख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनात न्याय मिळवून देत आरोपींना सोडणार नाही असा शब्द दिला. पण तरीही आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण इतकं का पेटवले?, असा सवाल त्यांनी केला आहे. तर मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही त्यांनी माझ्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी त्यांना समज द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
पक्षाने मला कधीच जाब विचारला नाही
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मुख्यमंत्रीपदाचा जे वक्तव्य ते 10 वर्षांपासून मला चिकटले आहे. पक्षीय पातळीवर त्या वक्तव्याचा काहीच परिणाम झाला नाही. माझ्या केंद्रातील, राज्यातील नेत्यांनी यावर काही चर्चा केली नाही. उलट आम्ही या वक्तव्याची मस्करी केली, की कशी बातमी झाली आहे. पक्षांने मला कधीही जाब विचारला नाही. मला आता कळते की आपन एखाद्याला उत्तर देताना त्याचा वेगळा अर्थ निघू नये याची काळजी घ्यावी.
मला खूर्चीची अपेक्षा नाही
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला कोणत्या खूर्चीची अपेक्षा नाही. जी खूर्ची मिळेल ती बळकट करण्याकडे माझे लक्ष असते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने माझा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला, तेव्हा माझ्या बाबांना फार आनंद झाला होता. ते माझ्या आईला म्हणाले होते बघ आपली पंकजा मोदींची स्टार प्रचारक आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली आणि माझा मंत्रिमंडळात समावेश होऊन ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.