digital products downloads

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी: मुंबई-ठाण्यात यलो अलर्ट, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट, केरळात आठवडाभर आधी दाखल – Mumbai News

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी:  मुंबई-ठाण्यात यलो अलर्ट, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट, केरळात आठवडाभर आधी दाखल – Mumbai News


राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत वातावरणात गारवा पसरवला आहे. शनिवारी रात्रीपासून मुंबई आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाच्या सरी बरसत असून, हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट, तर रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आज सकाळपासून

.

दरम्यान, अद्याप शहरात कुठेही मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याचे प्रकार समोर आलेले नसले, तरी हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा परिसरातही पुढील 3-4 दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सून केरळमध्ये आठवडाभर आधी दाखल

यंदा नैऋत्य मोसमी पाऊस अपेक्षेपेक्षा आठवडाभर आधीच केरळात दाखल झाला आहे. 2009 नंतर प्रथमच इतक्या लवकर मान्सूनने केरळचा टप्पा गाठला आहे. शनिवारी मान्सूनने केरळ, तामिळनाडू व्यापून कर्नाटकच्या दिशेने वाटचाल केली असून, आता तो गोव्याच्या वेशीवर पोहोचला आहे. पुढील काही तासांत कोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण कोकण आणि मध्य अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये ढगाळ हवामान आणि जोरदार पावसाचे चित्र निर्माण झाले आहे.

पुण्यात रिमझिम पावसाची सुरुवात

रविवारी पहाटेपासून पुण्यात रिमझिम पावसाची सुरूवात झाली असून, वातावरणात गारवा आणि आल्हाददायक बदल जाणवू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात शहरातील काही भागांत पाणी साचल्याने प्रशासन सजग झाले आहे.

या पार्श्वभूमीवर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. “कोथरूडमध्ये पाणी तुंबू देऊ नका,” असा आदेश त्यांनी दिला असून, या भागात समन्वय अधिकारी नेमण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. कोथरूडमधून वाहणाऱ्या 15 नाल्यांपैकी 80 टक्के नाल्यांची सफाई पूर्ण झाल्याचे महापालिकेने सांगितले आहे. उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसाने वेग घेतल्याने प्रशासन सजग झाले आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp