
- Marathi News
- National
- Red Fort Blast Case: Bombs Were Being Made In Faridabad; Weapons Were Supplied From Kashmir
नवी दिल्ली16 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
एनआयएने लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी तीन आरोपींविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएनुसार फरार बालरोगतज्ज्ञ मुजफ्फर अहमद हा अल-कायदाशी संबंधित एजीयूएच इंटरिम मॉड्यूलचा संस्थापक सदस्य असून कटातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक होता. आरोपपत्रानुसार, फरिबाद येथील अल-फलाह विद्यापीठाच्या गुप्त ठिकाणी टीएटीपी-आधारित आयईडी तयार करणे या कारवायांमध्ये मुजफ्फर अहमदचा सामील होता.
आरोपपत्रानुसार जून २०२२ मध्ये श्रीनगरच्या ईदगाह परिसरात झालेल्या गुप्त बैठकीत एजीयूएच इंटरिम मॉड्यूलची स्थापना केली होती. एनआयएनुसार मुजफ्फर अहमद हा या मॉड्यूलचा संस्थापक सदस्य होता. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. त्याचा शोध सुरू आहे.
जम्मू-काश्मीरच्या तुफैल अहमद भट याने एके-४७, क्रिंकोव्ह रायफल, पिस्तूल, मॅगझिन आणि जिवंत काडतुसे गोळा करून तीन लाख रुपयांत मुख्य आरोपी डॉ. उमर उन नबी याच्यापर्यंत पोहोचवल्याचा आरोप आहे.
टीएटीपी : साध्या धक्क्यानेही स्फोट… दिल्लीतील लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेला स्फोट वाहनामध्ये बसवलेल्या इम्प्रूव्हाइज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी)मुळे झाला होता. या स्फोटात टीएटीपीचा वापर झाल्याचा संशय आहे. अगदी हलका धक्का, उष्णता किंवा घर्षणामुळेही त्याचा स्फोट होऊ शकतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
