
क्युरिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वाळुज एमआयडीसी आणि छत्रपती संभाजी नगर सीटू युनियन यांच्यात कामगारांच्या पगारवाढीसाठी २३ जुलै २०२५ रोजी सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत कामगारांना १९००१ रुपयांची पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
.
हा करार तीन वर्षांसाठी असून करारातील ५०% रक्कम बेसिक वेतनात वाढविण्यात आली आहे. पहिल्या वर्षी ७०%, दुसऱ्या वर्षी १५% आणि तिसऱ्या वर्षी १५% अशी वाढ करण्यात आली आहे. कॅन्टीन भत्त्यामध्ये ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
दिवाळी बोनसमध्ये २४५० रुपयांची वाढ करण्यात आली असून आता एकूण ३२४५० रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे. फेस्टिवल अॅडव्हान्समध्ये १०००० रुपयांची वाढ करण्यात आली असून आता एकूण ४०००० रुपये अॅडव्हान्स मिळणार आहे.
कामगारांना शैक्षणिक कर्ज म्हणून बिना व्याजाचे १ लाख रुपये देण्याचेही मान्य करण्यात आले आहे. महागाई भत्ता (डी.ए.) मुंबई इंडेक्समध्ये २ रुपयांवरून प्रति पॉइंट २० पैसे वाढ करण्यात आली आहे.
पेड हॉलिडे दिवशी कामगार कामावर आल्यास त्यांना मूळ वेतन आणि डी.ए.च्या ५ पट रक्कम ओव्हरटाइम म्हणून देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या या करारामुळे कामगारांना २२००० रुपयांची वाढ मिळणार आहे.
कामगारांचा अचानक किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास सर्व कामगार व कर्मचारी यांचा एक दिवसाचा पगार आणि त्या रकमेच्या तीन पट रक्कम कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांच्या वारसांना देण्यात येणार आहे.
सर्व कामगारांना मागील १४ महिन्यांचा पगार फरक व डी.ए. फरक १००% देण्याचे मान्य करण्यात आले आहे. प्रत्येक कामगाराला जवळपास १५०००० ते १७५००० रुपयांची फरकाची रक्कम मिळणार आहे.
या करारावर कामगार उपायुक्त नितीन पाटनकर, सहायक कामगार आयुक्त जी.बी. बोरसे यांच्या उपस्थितीत व्यवस्थापनाचे संचालक मनोज डोरलीकर, एच.आर. असोशिएट डायरेक्टर आमना हुसैन, एच.आर. असिस्टंट मॅनेजर रविंद्र भागडे आणि सीटू युनियनचे जेष्ठ कामगार नेते लक्ष्मण साकुडकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या कराराचे कामगारांनी मिठाई वाटून जल्लोषात स्वागत केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.