
वसमतच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या ३० एकर परिसरात वाढलेले गवत, भोजनामध्ये आळ्या निघत असून विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून ५३ पालकांनी त्यांच्या पाल्याच्या टीसी देण्याची लेखी मागणी रविवारी ता. २० केली आहे. या प्रकार
.
वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी पासून ते १२ वी पर्यंत वर्ग आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्थाही आहे. त्यानुसार बहुतांश पालक त्यांच्या पाल्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश देण्यासाठी इच्छूक असतात. मात्र, प्रवेश परिक्षेतून या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे निवड केली जाते.
दरम्यान, यावर्षी ता. ३ जुलै रोजी काही विद्यार्थी विद्यालयात प्रवेशीत झाले आहेत. मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विद्यालयाच्या ३० एकर जागेवर गवत उगवले असून त्या ठिकाणीच विद्यार्थी खेळ खेळतात. यावेळी साप, विंचू यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय विद्यार्थ्यांच्या भोजनामधे आळ्या निघत असून भोजन निकृष्ठ दर्जाचे आहे. होमीभाभा बालवैज्ञानिक परिक्षेची कुठलीही माहिती विद्यार्थ्यांना दिली नाही. या शिवाय विद्यालयात पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात नाही. तर अंघोळीसाठी गरम पाणी नसल्यामुळे विद्यार्थी दोन ते तीन दिवस अंघोळ करीत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी एक सप्ताहाची वेळही दिली होती. मात्र, विद्यालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुविधाच उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे पाल्यांची टीसी परत देण्याची मागणी पालकांनी केली आहे.
या संदर्भात पालक एस. डी. दुट्टे, एल. एन. मांगीराम, योगेश पाटील, गोविंद राऊत, उत्तम खुडे, रंजीत धबडगे, संतोष झुंजार, सोमानाथ पांचाळ यांच्यासह ५३ पालकांनी लेखी पत्र विद्यालय प्रशासनाकडे सादर केले आहे. आता यावर विद्यालय प्रशासन काय भूमिका घेणार? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात प्राचार्य सुरेश गवई यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.