
शिवसेना नेते संजय निरुपम यांनी गुरुवारी दिशा सालियन प्रकरणात पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी आदित्य यांचा उल्लेख ‘हत्यादित्य’ असा करत अप्रत्यक्षपणे तेच दिशाच्या मृत्यूला कारणी
.
संजय निरुपम येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले की, राज्य सरकारची एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. तिच्या मृत्यूनंतर 3 दिवसांनी शवविच्छेदन करण्यात आले. दिशाचा मृतदेह जिथे सापडला, ती जागा इमारतीपासून जवळपास 25 फूट लांब आहे. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. ती नग्नावस्थेत होती असा प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे.
आदित्य ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाला खोटे सांगितले
या प्रकरणात खूप मोठे लोक सहभागी होते. पण त्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या घटनेनंतर सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू झाला. सुशांतचे प्रकरण वेगळे आहे. आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली. त्यांनी एका अर्जाद्वारे कोर्टात माझी चौकशी झाली, सीबीआयने मला क्लीनचिट दिली असे सांगितले. पण दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआय करत नाही. हा तपास मुंबई पोलिसांकडे आहे. त्यामुळे त्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिली.
संजय निरुपम यांनी यावेळी दिशाच्या मृत्यूमागे ड्रग्ज रॅकेट असल्याचाही संशय व्यक्त केला. ते म्हणाले, दिशाच्या मृत्यूमागे ड्रग्ज रॅकेट असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी समीर खान नामक व्यक्तीला अटक झाली होती. त्याने चौकशीत आदित्य ठाकरे यांना ड्रग्जची सवय असल्याचे सांगितले आहे. ड्रग्ज पेडलरने दिलेला जबाब दिशाच्या मृत्यूमागे काय – काय झाले? त्याचा आधार होता. मालवणी पोलिसांनी त्याची चौकशी करण्याची गरज होती. पण त्यांनी तो केला नाही. आता मालवणीतील तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल होईल. नंतर यासंबंधी आदित्य ठाकरे यांनाही अटक होऊ शकते. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचे नाव हत्यादित्य होईल. दिशाच्या हत्येत त्यांचा समावेश होता हे ही सिद्ध होईल.
आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा
संजय निरुपम यांनी यावेळी कुणाल कामराचा व्हिडिओ आणून ठाकरेंनी आपल्यावरील आरोपांपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. विधानसभेत आमचे आमदार जे बोलले रेकॉर्डवर आहे. बीडमध्ये सरपंचाची हत्या झाली. त्या हत्येतील आरोपी वेगळे होते. पण आरोपींशी संबंध असल्यामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याच आधारावर आदित्य ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल झाला आणि त्यांचे हत्या प्रकरणात नाव आले तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांनी आपल्या पदापासून दूर राहिले पाहिजे, असे निरुपम म्हणाले.
मालवणी पोलिसांत 1-2 दिवसांत गुन्हा दाखल होणार
उल्लेखनीय बाब म्हणजे दिशा सालियनच्या वडिलांनी आपल्या वकिलांसह नुकतीच मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. संजय निरुपम या भेटीचा दाखला देत म्हणाले की, दिशाच्या वडिलांनी पोलिसांना दिलेली माहिती खूप गंभीर आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात 1-2 दिवसांत गुन्हा दाखल होईल. या प्रकरणात आदित्य ठाकरे, सुरज पंचोली, डिनो मोरिया व इतर काहीजण मुख्य आरोपी आहेत.
दिशाचा 8 जून 2020 रोजी संशयास्पद मृत्यू झाला. ती सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. ही घटना घडली तेव्हा आदित्य ठाकरे मंत्री होते. त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांची काहीतरी भूमिका आहे असे समोर आले होते. 8 जून रोजी रात्री दिशाचा मृत्यू झाला तेव्हा त्या पार्टीत हे सर्वजण तिकडे उपस्थित होते. पण हे प्रकरण तत्कालीन सरकारने दडपले. मालवणी पोलिसांनीही निष्पक्ष तपास केला नाही, असेही निरुपम यावेळी आदित्य ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.