
- Marathi News
- National
- No Rain For A Week; Dry Hot Winds Will Blow, Mercury Will Also Increase, Amravati Highest 46.8, Sambhajinagar 41.7
नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, त्याआधीचे दिवस उष्णतेचे असतील. खासगी हवामान संस्था स्कायमेटने मंगळवारी इशारा दिला की पश्चिमी विक्षोभ कमकुवत आहे. सध्या कोणतीही वेदर सिस्टीम येत नाहीये. यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पुढील एक आठवडा कोरडा राहील. दिवस उष्ण राहतील.
मेच्या उर्वरित दिवसांत मध्य प्रदेशातील अनेक भागांत होरपळवणारी उष्णता राहील. पारा ४५ अंशांवर जाईल. महाराष्ट्रात मंगळवारी अमरावती सर्वाधिक ४६.८ तापमान होते, तर छत्रपती संभाजीनगरात ४१.७ अंश तापमानाची नोंद झाली. हवामान विभागानेही म्हटले की मध्य भारतावर एक विशाल चक्रीवादळ तयार झाले आहे, जे दिल्ली-एनसीआर, यूपी, महाराष्ट्र, गुजरातपर्यंत पसरले आहे.
भास्कर एक्स्पर्ट डॉ. अजय माथूर, ऊर्जातज्ञ; प्राध्यापक, आयआयटी दिल्ली
मानवी शरीरासाठी ३५ अंश वेट बल्ब टेंपरेचर जीवघेणे
देशात वेट बल्ब टेंपरेचर घसरून ३५ वर आले आहे. ४० वर्षांपूर्वी ते ४२ अंश होते. म्हणजेच मानवी शरीर जीवघेण्या तापमानाजवळ पोहोचत आहे. गेल्या वर्षी ४० दिवस ते ३१ अंश होते. ५ वर्षांपूर्वी ते २४ दिवस होते. वेट बल्ब टेंपरेचर कमी होत आहे. हे ते किमान तापमान आहे, जिथे शरीर घाम गाळून स्वतःला थंड करू शकते. तापमान ४० अंश आहे, पण हवा कोरडी आहे, तर शरीर घामामुळे स्वतःला वाचवू शकते. पण तापमान ३५ अंश आहे आणि आर्द्रता जास्त आहे तेव्हा शरीराची कूलिंग सिस्टीम फेल होऊ लागते. उन्हात काम करणाऱ्या मजुरांना, हृदय आणि फुफ्फुसांच्या रुग्णांना जास्त धोका आहे. शहरांत घरे एकमेकांच्या इतकी समोरासमोर असतात की एकाची उष्णता दुसऱ्यावर पडते. भिंतीला थंड होण्यासाठी वेळ मिळत नाही. दुसऱ्या दिवशी घरे पुन्हा गरम होतात. रात्रीचे तापमान आता सातत्याने ३० अंशांवर जात आहे, जे धोकादायक आहे. (इको एन एनर्जी टॉकशी झालेल्या संवादात)
मान्सून २-३ दिवसांत लक्षद्वीपला पोहोचेल
भारतभर पाऊस पाडणाऱ्या नैऋत्य मान्सूनने मंगळवारी कोमोरीन समुद्र, श्रीलंका, बंगालच्या उपसागराचा दक्षिण-पश्चिम भाग यातील आणखी काही भाग व्यापला. तो दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाला आहे. २-३ दिवसांत लक्षद्वीप समूहातील मिनिकॉय बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






