
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर विशेष बैठक पार पडत असताना, राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर ताशेर
.
बैठक म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण
रोहिणी खडसे म्हणाल्या की, आजची बैठक म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. वैष्णवी हगवणेचा जीव गेल्यावर आता बैठकीचे नाटक केले जात आहे. आधीच बैठक घेतली असती, आयोगाने तत्परतेने भूमिका घेतली असती, तर ही वेळ आली नसती. आयोग सध्या व्यक्तीकेंद्रित झाला आहे. सात सदस्यांची पदे रिक्त आहेत. सगळा कारभार एकट्याच व्यक्तीकडे आहे. आणि त्या महिलाध्यक्षा म्हणे, ‘झिरो पेंडन्सी!’ — मेलवर आलेल्या तक्रारी पोलिस स्टेशनला पाठवल्या की काम संपते का?
आयोगाचे तक्रारीकडे दुर्लक्ष
रोहिणी खडसे म्हणाल्या की, खेड्यापाड्यांतील सामान्य महिलांना मेल कसा करायचा माहितीही नसते. अशा महिलांची पोस्टाने आलेली तक्रार दुर्लक्षित होते, याचे उत्तर कोण देणार? प्रिया फुके यांनी एक वर्षापूर्वी पोस्टाने तक्रार केली होती. चाकणकर म्हणतात आमच्याकडे आलीच नाही. मग अशा व्यवस्थेवर महिलांनी विश्वास ठेवायचा तरी कसा?
सगळा वेळ पक्षाच्या कामात, आयोगाकडे दुर्लक्ष
रोहिणी खडसे म्हणाल्या की, महिला अध्यक्षा दोन जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. प्रत्यक्षात आयोगाच्या बैठका घेतल्या जात नाहीत, तक्रारींचे प्रत्यक्ष निराकरण होत नाही. सगळा वेळ पक्षाच्या कामात जातो. अशा परिस्थितीत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.