
देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीमध्ये ओलावा नाही. एखाद्या व्यक्तीच्या जयंतीला नतमस्तक व्हावे की, श्रद्धांजली वाहण्याचे काम करावे, हे देखील त्यांना कळत नाही. त्यामुळेच विधानसभा निवडणुकी
.
राहुल गांधी यांच्या बाबतीत असे वारंवार का होते? हे मला माहित नाही. मात्र कायमच त्यांना महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये किंवा जनजीवनाच्या बाबतीमध्ये कितपत माहिती आहे? हा प्रश्न असल्याचे धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. अभिवादन आणि श्रद्धांजली कधी वाहतात, हे सुद्धा त्यांना सांगावे लागत असेल तर काय बोलणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या माध्यमातून राहुल गांधी आणि काँग्रेसवर खासदार माने यांनी निशाणा साधला आहे.
लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी जयंतीदिवशी शिवरायांना श्रद्धांजली वाहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नव्याच वादाला तोंड फुटले आहे. राहुल गांधी यांच्याकडून महापुरुषांचा सतत अपमान सुरू असल्याचा आरोप करत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या माफीची मागणी केली आहे. महाराष्ट्रासह देशभरात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. शिवप्रेमींपासून राजकारण्यांपर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यात राहुल गांधी यांनीही शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र शिव जयंतीनिमित्ताने छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याऐवजी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली या शब्दाचा उल्लेख केला होता.
राहुल गांधीची पोस्ट काय?
राहुल गांधी यांनी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.
भाजपकडून माफीची मागणी…
महाराष्ट्रातील लोकांचा, महापुरुषांचा राहुल गांधी यांच्याकडून सतत अपमान केला जात असतो. जयंतीच्या दिवशी आदरांजली वाहतात. परंतु राहुल गांधी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादर व्यक्त करतात. त्यातील हा गंभीर प्रकार आहे. त्यांनी हे ट्विट मागे घ्यावे, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले, असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
औरंग्याच्या पिलावळींकडून दुसरी काय अपेक्षा करणार – राणे
औरंग्याच्या पिलावळाकडून अजून दुसरी काय अपेक्षा नाही. हे हिरवे साप आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जगभरात एक वर्ग आहे. त्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही श्रद्धांजलीचा उल्लेख करता! राहुल गांधींनी देशाची, जनतेची आणि शिव प्रेमींची माफी मागितली पाहिजे. शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक व्हावे. राहुल गांधींनी महाराजांची माफी मागितली नाही, तर त्यांना फिरू देणार नाही, असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न
राहुल गांधींनी केलेल्या ट्वीटमुळे वाद उफळला असता, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ते म्हणाले, राहुल गांधींनी शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना काय म्हटले, तर माय हंबल ट्रिब्यूट. म्हणजे मी त्यांना अभिवादन करतो, नमन करतो हा त्यांचा त्या मागचा भाव आहे. आता ‘ध’ चा ‘मा’ करून विनाकारण घाणेरडे राजकारण विरोधकांनी करू नये, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.
एवढी मोठी चूक लक्षात का आली नाही?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी देखील राहुल गांधींच्या या पोस्टवर आक्षेप घेतला. राहुल गांधी यांच्याकडून ही चूक झाली असेल तर त्यांनी माफी मागावी, ट्वीटमध्ये दुरुस्ती करावी, असे ते म्हणाले. एवढी मोठी चूक त्यांच्या लक्षात का आली नाही? असा सवालही मिटकरी यांनी केला.
राहुल गांधींनी सावकरांबद्दलही केले होते वादग्रस्त विधान
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडनमध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान सावरकरांवर भाष्य केले होते. सावरकरांनी आपल्या 5 ते 6 मित्रांच्या मदतीने एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती आणि या मारहाणीचा आनंद लुटला होता, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता. या प्रकरणी पुणे जिल्हा न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरोधात खटलाही सुरु आहे. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांनी तक्रार दाखल केली होती. आता त्यातच शिवजयंतीला शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट करण्यात आले आहे. त्यामुळे राहुल गांधी नवीन वादात अडकले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.